Friday , August 28 2026
Breaking News

छ. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने उद्या सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

Spread the love

 

बेळगाव : छ. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने सीमाभागातील ८६५ विद्यार्थ्यांसाठी २०२६-२७ नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशाची संधी आणि फी सवलत जाहीर केली आहे.
फी सवलत: अनुदानित अभ्यासक्रमांसाठी पूर्ण ट्यूशन फी आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी २५% ट्यूशन फी माफ. जे विद्यार्थी वसतिगृहासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्याकरीता वसतिगृह फी सुद्धा माफ करण्यात आली आहे.
प्रवेश परीक्षा: प्रवेश परीक्षेसह अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ मे २०२६ आहे आणि परीक्षा १२ ते १५ मे २०२६ दरम्यान होईल.
थेट प्रवेश: प्रवेश परीक्षेविना अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

कार्यशाळा: सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी बुधवार दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता बेळगावमधील संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात कार्यशाळा आयोजित केली आहे. त्याठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी छ. शिवाजी विद्यापीठांमधील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी ज्या विद्यार्थ्यांना सवलतीमध्ये बी.ए , बी. कॉम, बी.एस्सी, एम.ए, एम. एस्सी, एम.कॉम, एम.सी.ए, बी.बी.ए, एम.बी.ए, बी.टेक, एम टेक, एम एस डब्ल्यू. आणि इतर विविध विषयात शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना ही सुवर्णसंधी आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा, फि आणि वसतिगृहामध्ये सवलती असून त्याचा लाभ सीमावासियानी करून घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेचे साडेपाच लाखांचे दागिने लंपास

Spread the love गर्दीचा फायदा घेत डाव साधला; सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *