Monday , June 22 2026
Breaking News

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी राजा शिव छत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक 11 वाजता बोलवण्यात आली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे आणि मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश केसरकर यांचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार समारंभाला समिती पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि समिती कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. त्याचबरोबर बेळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सह्यांच्या मोहिमेची पुस्तके बैठकीदरम्यान समिती पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर येथे म. ए. समितीविरोधात प्रशासनाला निवेदन

Spread the love  खानापूर : २२ जून रोजी म. ए. समितीने आयोजित केलेल्या आंदोलनाला प्रशासनाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *