Saturday , August 29 2026
Breaking News

ई-केवायसी करण्यासाठी ज्येष्ठांना त्रास; गॅस सिलिंडरसाठी निपाणीत वाढला संघर्ष

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या सूचनांवर आधारित अंमलबजावणी होत असल्याने विशेष करुन ज्येष्ठांची गैरसोय अधिकच वाढली आहे.
गॅस सिलिंडर एजन्सींमध्ये सिलिंडर घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रथम ई-केवायसी पूर्ण करण्याचे सांगितले जात आहे. कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाइन प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया अनेकांसाठी वेळखाऊ ठरत आहे. परिणामी, अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असून गॅस मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागत आहेत.
डिजिटल प्रणालीची सवय नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. काही ठिकाणी ई-केवायसीसाठी एजन्सीबाहेरच रांगा लागल्याचे दिसून येत आहेत. दलालांच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रकारही काही ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. गॅस एजन्सीधारकांचीही स्थिती द्विधा मनःस्थितीत आहे. वरून आलेल्या सूचनांचे पालन करताना ग्राहकांचा रोष सहन करावा लागत आहे. शहरातील गॅस एजन्सीतील ग्राहकांना ई-केवायसी करण्यासाठी डोळे किंवा बोटांचे फिंगर स्कॅन करून केवायसी करावी लागते. मात्र, ज्येष्ठांचे डोळे किंवा फिंगर स्कॅन करण्यात अडचण येत असून ते आधारच्या डेटा ला मॅच होत असल्याने गैरसोय वाढत चालली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० रुग्णांनी घेतला लाभ

Spread the love    निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटना शाखा हदनाळ आणि डॉ.अनिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *