Saturday , August 29 2026
Breaking News

ध्येय, परिश्रम, जिद्दीमुळे विद्यार्थ्यांचे यश

Spread the love

 

अण्णासाहेब हवले; गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यासागर संस्थेच्यावतीने सत्कार

निपाणी (वार्ता) : वर्षभर निरंतरपणे अभ्यास केल्याने यश मिळते हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. ध्येय चिकाटी ठेवून अभ्यास केल्यास निश्चितच आयुष्यात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होऊ शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी निरंतर पाणी अभ्यास करून परीक्षेत चांगले यश मिळवावे. त्यामुळे समाज गाव आणि शिक्षण संस्थेचे नाव मोठे होऊ शकते. आपला संस्थेचा दहावीचा निकाल विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून पुढील शिक्षणातही त्यांनी असेच यश मिळवावे असे मत संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब आवले यांनी व्यक्त केले.
येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्था संचलित शाळेने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आहे. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
केंद्रात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून विद्यार्थ्यांनी संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ठसा उमटवला आहे. राजू खिचडे यांनी स्वागत केले.
इंग्रजी माध्यमात अक्षरा महाजन हिने 95.68% गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांक, साक्षी खोत हिने 91.84% गुणांसह द्वितीय, तर समीक्षा हवले हिने 87.04% गुण मिळवून तृतीय, तर कन्नड विभागातही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले. अक्षरा खिचडे व संध्या मोतीचंद चव्हाण या दोघींनीही 95.4% गुण मिळवत केंद्रात द्वितीय व शाळेत प्रथम, तर शिवराज अण्णाप्पा माळगे याने 92.96% गुणांसह केंद्रात तृतीय व शाळेत द्वितीय स्थान मिळवले, साक्षी सत्यप्पा माळगे हिने 92.64% गुण मिळवत शाळेत तृतीय क्रमांक मिळवला.
अक्षरा महाजन व संध्या चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास बाबासाहेब पाटील, मलगोंडा म्हैशाळे,, विद्याधर अम्मनावर, रावसाहेब तेरदाळे, शिवाप्पा माळगे, भाऊसाहेब पाटील, बाळासाहेब बसन्नवर, बाळासाहेब कमते, नंदकुमार हवले, मुख्याध्यापक एस. एस. कोळी, मोतीचंद चव्हाण, तानाजी महाजन यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते. अनिल मुन्नोळी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० रुग्णांनी घेतला लाभ

Spread the love    निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटना शाखा हदनाळ आणि डॉ.अनिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *