Sunday , April 26 2026
Breaking News

गणेश मंडळ देसाईवाडा (तिओली) ग्रामस्थांच्या वतीने मध्यवर्ती समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सन्मान

Spread the love

 

खानापूर : शुक्रवार दिनांक 24 रोजी तिओली (देसाई वाडा) येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. गणेश मंडळ देसाईवाडा आणि ग्रामस्थांच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. सत्काराला उत्तर देताना प्रकाश मरगाळे म्हणाले की, अंतिम टप्प्यात आलेला सीमाप्रश्न सोडवून संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन आणि मराठी भाषिकांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू असे आश्वासन दिले. यावेळी तज्ञ समिती सदस्य प्रकाश चव्हाण, समितीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेलार, राजाराम देसाई, सुनील पाटील, अभिजीत सरदेसाई, गोपाळ हेबाळकर (निवृत्त शिक्षक), शेखर पाटील, उमेश पाटील, सुहास हुद्दार, विकास कलघटगी यांच्यासह श्री गणेश मंडळ देसाई वाडा येथील श्री. विठ्ठल देसाई, यशवंत देसाई, दीपक देसाई, विशाल देसाई, शंकर देसाई, निळकंठ देसाई, सटवाप्पा देसाई, राजू देसाई, अमृत देसाई,
आदी उपस्थित होते.यशवंत देसाई यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळस शोभायात्रा भक्तिमय वातावरणात

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *