Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : म्हादई नदी वळणाच्या प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या नियुक्त पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात जंगलतोड आणि विखंडन करून अपरिवर्तनीय नुकसान होणार आहे. तसेच म्हादई -मलप्रभा पाणलोट क्षेत्रात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन प्रदेशातील लोकांच्या उपजीविकेवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. या खेरीज अन्य इतर गंभीर कारणास्तव कळसा -भांडुरा प्रकल्प सरकारने …

Read More »

कणकुंबी शाळेचा 129 वा शतकोत्तर रौप्यमहोत्सव कार्यक्रम 15 एप्रिलला

  खानापूर : कणकुंबी, ता. खानापूर – सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, कणकुंबी (ता. खानापूर) ही शाळा आपल्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने 15 एप्रिल 2025 मंगळवार रोजी एक भव्य कार्यक्रम आयोजित करीत आहे. या शाळेची स्थापना 1895 साली झाली असून, या संस्थेने 129 वर्षांची गौरवशाली वाटचाल पूर्ण केली आहे. या सोहळ्यासाठी …

Read More »

खानापूरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शनिवारी भव्य शोभायात्रा

  खानापूर : विश्व हिंदु परिषद व बजरंग दल खानापूर यांच्या वतीेने शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने खानापूर शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रति वर्षाप्रमाणे हनुमान जयंती जन्मोत्सवानिमीत खानापूर शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून …

Read More »

कळसा भांडुरा प्रकल्पाला विरोध करण्याचा खानापूर येथील बैठकीत निर्धार

  खानापूर : खानापूर तालुक्यातील असोगा, रूमेवाडी, करंबळ, तसेच इतर गावातील शेतकऱ्यांना जमीन स्वाधीकरणाबाबत कर्नाटक सरकारने नोटीस पाठवली आहे. कळसा-भांडुरा प्रकल्पाद्वारे धारवाड जिल्ह्यातील गावाना पाणी पुरवण्यासाठी जी योजना केली आहे. या योजनेमुळे खानापूरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी व पाऊस यांची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. त्यासाठी आज बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी, …

Read More »

मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचा बारावी वार्षिक निकालात तालुक्यात वरचष्मा!

  खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे विद्यार्थ्यांच्या सर्वगुणसंपन्नत्तेवर भर देणारे नामांकित महाविद्यालय असून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमात अग्रेसर असतात हे आपण नेहमीच वर्तमान पत्रात व सोशल मेडियावर पहात असतो. येथील विद्यार्थिनी अभ्यासातही आपला रूबाब राखून आहेत. गेले अनेक वर्षे इयत्ता बारावी …

Read More »

चिकदिनकोप येथे युवकाची आत्महत्या….

  खानापूर : खानापूर तालुक्यातील चिकदिनकोप येथील युवक महावीर गुंडू हनीगोळ (वय 26) याने आज मंगळवार दि. 8 मार्च रोजी दुपारी दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिकदिनकोप येथील महावीर गुंडू हनीगोळ या युवकाची शेती अल्पशा स्वरूपात असून, त्याला …

Read More »

जत्रेसाठी मावशीकडे आलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू

  खानापूर : मावशीच्या गावी जत्रेला आलेल्या युवकाचा तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देमिनकोपमध्ये (ता. खानापूर) रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. तरुण चलवादी (वय २१, रा. कंचनोळी, ता. हल्ल्याळ) येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, कोडचवाड येथील श्री कलमेश्वर देवाची यात्रा आज मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, …

Read More »

विवाहित महिलेचा पाठलाग करून मानसिक छळ; इदलहोंड येथील प्रकार

खानापूर : एका विवाहित महिलेचा पाठलाग करून मानसिक त्रास देणाऱ्या व्यक्तीने सदर महिलेवर व तिच्या पतीवर आज अचानक वीटभट्टीवर काम करत असताना हल्ला चढवून महिलेच्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार इदलहोंड येथे घडला. मिळालेल्या माहितीनुसार, काजल मल्लप्पा पुजारी (मूळ रचाकट्टी, हुक्केरी) ही विवाहित महिला काही …

Read More »

गाडीकोप खून प्रकरणी नवी कलाटणी; अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा!

खानापूर : गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात बलोगा गावात घडलेल्या खून प्रकरणी वेगळीच कलाटणी मिळाली असून पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलोगा गावात दोन दिवसांपूर्वी एका शेतात मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी २४ तासात पोलिसांनी आरोपीला …

Read More »

खानापूर परिसरात चोरट्यांचा हैदोस; आठ घरातील लाखोंचा ऐवज लंपास

  खानापूर : खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करत आठ घरांची तोडफोड केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक लाळसाब गौंडी यांच्यासमोर या गुन्ह्याचा तपास मोठे आव्हान ठरणार आहे. खानापूर तालुक्यातील गुंजी, करंबळ आणि देवलत्ती या …

Read More »