खानापूर : खानापूर तालुका मल्टीपर्पज को- ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीची तिसरी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी चेअरमनपदी सौ. धनश्री कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच व्हा. चेअरमनपदी संस्थेचे ज्येष्ठ संचालक खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. रामचंद्र कृष्णाजी खांबले यांची निवड करण्यात आली. सुचक म्हणून …
Read More »ऊसाच्या फडाला लागलेली आग विझविताना वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; कारलगा येथील दुर्दैवी घटना
खानापूर : खानापूर तालुक्यातील कारलगा येथे उसाच्या फडाला लागल्याने ती आग विझविण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारलगा येथील एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली आहे. आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या सदर दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव तुकाराम रवळू पवार (वय 75) असे आहे. सदर शेतकरी …
Read More »नंदगडची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीची यात्रेला मोठ्या उत्साहाने सुरुवात
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगडची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीची यात्रेला मोठ्या उत्साहाने सुरु झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नंदगड या ऐतिहासिक क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांची समाधी असलेल्या गावामध्ये सुमारे २४ वर्षांनंतर, ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आले असून आज ब्राह्मी मुहूर्तावर देवीचा विवाह सोहळा पार पडला. …
Read More »आई-वडील, सासू-सासरे यांच्या योगदानातून आपण उच्च पदावर : सुषमा शेलार
मणतुर्गे येथे माहेरवाशीनींचा सत्कार सोहळा खानापूर : मणतुर्गे येथे श्री पांडुरंग सप्ताह उत्सवानिमित्त श्री रवळनाथ मंदिर कमिटीतर्फे दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता मणतुर्गे येथे माहेरवाशीनींचा सत्कार सोहळा मानाचा फेटा व वाण देऊन मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अंकिता राजाराम पाटील या होत्या. स्वागताध्यक्ष सौ. …
Read More »मराठा मंडळाचे ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांचा जागर!
खानापूर : मराठा मंडळाचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय नेहमीच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासावर भर देणारे पदवीपूर्व महाविद्यालय म्हणून परिचयाचे आहे. क्रीडा क्षेत्रात नेहमीच चर्चेत असणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धांमध्ये ही आपला नावलौकिक वाढवित असून अलिकडे या महाविद्यालयातील तेरा विद्यार्थ्यांनी भारतीय लष्करात विविध हुद्द्यावर भरती झाल्या आहेत. मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. …
Read More »खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड अखेर निलंबित
खानापूर : खानापूरचे तहसिलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांना अखेर निलंबीत करण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांच्या बेळगाव येथील राहत्या घरांसह, निपाणी, अकोळ व खानापूर येथील सहा ठिकाणी लोकायुक्तांनी छापेमारी करून बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती. प्रकाश गायकवाड यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गैरमार्गाने कमावल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची …
Read More »शेतातील बांधावर माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर; ऐकून घेतल्या महिलांची गाऱ्हाणे….
खानापूर : काय करणार ताई रोजगारच बंद हाय….तो चालू व्हता तंन बर व्हत.. हे उदगार आहेत, हलशी जवळील शेतात काम करणाऱ्या महिलांचे! अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर या खानापूर दौऱ्यावर असून, त्या कापोलीवरून चिक्कमुनवळीकडे जात असतांना हलशी पुलाजवळील शेतात दुपारच्या सुमारास काही महिला …
Read More »शनिवारपर्यंत सौरऊर्जेचा पुरवठा सुरळीत न झाल्यास हेस्कॉम कार्यालयाला घेराव; मेंडील ग्रामस्थांचा इशारा
खानापूर : शनिवारपर्यंत सौरऊर्जा सुरळीत न केल्यास हेस्कॉम कार्यालयाला घेराव घालू, असा इशारा खानापुर तालुक्यातील मेंडील येथील ग्रामस्थांनी दिला आहे. मेंडील गावात गेल्या आठ महिन्यांपासून सौरऊर्जा पुरवठा खंडित, खानापुरा तालुक्यातील मेंडील ग्रामस्थ गेल्या आठ महिन्यांपासून अंधारात जगत आहेत. हेस्कॉम या समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरले आहे. याला कंटाळून मेंडील …
Read More »केसरी समर्थ युवा, महिला संघ मोहीशेत व श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आक्राळी येथे हळदीकुंकू उत्साहात
खानापूर : केसरी समर्थ युवा व महिला संघ मोहीशेत व श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब आक्राळी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आक्राळी ता. खानापूर येथे आयोजित केलेला हळदी कुंकू कार्यक्रम 26/01/2025 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजा प्रभुत्व एकता आत्मनिर्भर महिला व युवा यांना प्रेरणा देण्यासाठी सदरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात थाटात …
Read More »बेळगांवहून निघालेला डिझेल टँकर कॅसलरॉकजवळ पलटी
रामनगर : जोयडा तालुक्यातील कॅसलरॉक येथे कलंबली क्रॉसजवळ डिझेलने भरलेला टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे टँकरमधील डिझेल रस्त्यावर पूर्णपणे गळून धोका निर्माण झाला आहे. देसुरहून कॅसलरॉककडे निघालेल्या टँकरचा हा अपघात घडला. टँकर रस्त्यावर आडवा झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिस आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta