Friday , November 6 2026
Breaking News

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी १ जून १९८६ रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या व सीमाप्रश्नासाठी आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. तरी कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *