Sunday , September 20 2026
Breaking News

अथणी येथे ओढ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

अथणी : अथणी तालुक्यातील संबरगी गावात मंगळवारी संध्याकाळी अग्रणी ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करताना दोन मुले आणि एका बैलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक संजय कांबळे (९) आणि गणेश संजय कांबळे (७) अशी मृत मुलांची नावे आहेत. ते आपल्या वडिलांसोबत संबरगी गावापासून नागनूर पी. गावाकडे बैलगाडीने जात असताना अग्रणी खंदकात पाण्यामुळे वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडले.

या दुर्घटनेतील आणखी एक मुलगा वेदांत संजय कांबळे याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *