खानापूर : गुंजी गावामध्ये छावणीतील पाळीव डुक्कर सोडलेली असल्यामुळे गावात डुकरांचा उपद्वाप वाढलेला आहे. याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. परिसरातील शेत पिकांचे देखील नुकसान होत आहे. त्यासाठी डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे निवेदन गुंजी ग्रामस्थांनी पीडीओ आणि ग्रामपंचायत अध्यक्षांना दिले आहे. पाळीव डुकरे गावामध्ये व परिसरातील शेतांमध्ये घुसून …
Read More »वरकड गावाजवळील पूल पावसामुळे कोसळला!
खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा गावापासून बारा किलोमीटरवर असलेल्या वरकड गावाजवळील पूल नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. त्यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे. पूल कोसळल्यामुळे बस बंद झाली आहे, त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. मागील वर्षी तात्पुरती डागडुजी झाली होती …
Read More »शेतजमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून निवेदन सादर खानापूर : बेळगाव- पणजी राष्ट्रीय महामार्गावरील शेतजमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत तालुक्यातील रस्ते मंजूर करण्याबाबत खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट …
Read More »तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील तारेचे कुंपण रहदारीला अडचण
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात नेहमीच रहदारीची समस्या चर्चेत असते. अशीच चर्चा खानापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर रहदारीची समस्या होत असल्याची चर्चा सर्व थरातुन होत आहे. खानापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील असलेल्या जागेवर चहाच्या टपरी चालु होत्या. त्या बंद करून त्या जागेवर तहसील कार्यालयाकडून तारेचे कुंपण घातले असल्याने तहसील कार्यालयात …
Read More »खानापूर तालुका समिती शिष्टमंडळाच्यावतीने महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन सादर
खानापूर : राज्यात अंगणवाडी सेविकांची नेमणूक करण्यात येत आहे. यात अंगणवाडी सेविका उमेदवारास प्रथम भाषा कन्नडची अट घातली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक गावात कन्नड भाषिक अंगणवाडी सेविकांची नेमणूक होणार आहे. त्यामुळे मराठी मातृभाषेच्या उमेदवारांवर अन्याय होऊन अंगणवाडीतील लहान बालकांना कानडी शिक्षण घेण्याची वेळ येणार आहे. यासाठी खानापूर …
Read More »कत्तलखान्याला घेऊन जाणाऱ्या १२ म्हशींची हरसनवाडीजवळ सुटका
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्या मार्गे गोव्याकडे कत्तलखान्याला घेऊन जाणाऱ्या जनावरांची सुटका करणे, जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडवून पोलिसाच्या ताब्यात देणे हे खानापूर हिंदुत्ववादी संघटना नेहमीच करतात. अशीच घटना सोमवारी खानापूरातुन चोर्ला मार्गे गोव्याला कंटेनरमधून १२ म्हशी कत्तलखान्याला घेऊन जाताना खानापूर जांबोटी मार्गावरील हरसनवाडी जवळ पकडून त्यांची सुटका …
Read More »लोंढा येथे आर्थिक व्यवहारातून दोघांवर ब्लेडने हल्ला
खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा गावात क्रिकेट सट्ट्याच्या पैशाच्या कारणावरून दोघांवर ब्लेडने वार करून गंभीर जखमी करण्यात आले असून या हल्ल्यात लोंढा गावातील रहिवासी अल्ताफ नाईक व इरफान मेहबूब देशपायीक हे गंभीर जखमी झाले असून बेळगाव येथील आसिफ जमादार आणि उमर शेख या दोघा हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. …
Read More »दि. खानापूर तालुका प्रायमरी टीचर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध
शिक्षकांतून समाधान खानापूर : नेहमीच चर्चेत असलेल्या खानापूर येथील दि. खानापुर तालुका प्रायमरी टीचर्स को-ऑप. सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभासदांच्या मागणीनुसार ठराव करण्यात आला होता. परंतु ही प्रक्रिया मर्यादित वेळेच्या नंतर झाल्यामुळे ३० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १५ उमेदवारांची निवड ही एका ज्येष्ठ सभासदाच्या मतदानाने पार पडण्यात आली. सर्व …
Read More »मराठी शाळा टिकवायची जबाबदारी प्रत्येकाचीच : आबासाहेब दळवी
बेळगाव : मराठी माध्यमांच्या शाळा टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावातील नागरिकांनी घेतली पाहिजे तसेच प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिकविण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शनिवारी मनतूर्गा, असोगा व रुमेवाडी गावातील सरकारी मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने पालकमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर
बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष गोपाळराव देसाई व माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन आज शनिवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले आले. निवेदनाचा स्वीकार करून पालकमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना देखील निवेदनाची प्रत …
Read More »