खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे खास दिवाळीच्या सणानिमित्त श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग यांच्यावतीने दिनांक 18 ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खो खो स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता होणार आहेत. विजयी संघांना पहिले बक्षीस रुपये. 21001, व ट्रॉफी,दुसरे …
Read More »डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रायोजकत्वाखाली ‘राजा शिवाजी’ संघ केएसपीएलमध्ये बेळगावचे नेतृत्व करणार
खानापूर : कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट लीग केएसपीएल-२ स्पर्धेत ‘राजा शिवाजी’ हा संघ बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, ती आयपीएलच्या धर्तीवर आयोजित केली जाणार आहे. माजी आमदार व कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट असोसिएशनच्या (एआयसीसी) सचिव डॉ. अंजली निंबाळकर या राजा शिवाजी संघाच्या मुख्य …
Read More »हत्तरवाड येथील शेतकऱ्याला सर्पदंशाने मृत्यू
बेळगाव : खानापूर तालुक्यातील हत्तरवाड येथील एका शेतकऱ्याला सर्पदंश झाल्याने इस्पितळात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून गणपती नारायण हलसकर (वय 52) असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपती हलसकर हे सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी, आपल्या शेतामध्ये काम करत असताना विषारी सर्पाने …
Read More »खानापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री फोडली तब्बल 9 घरे
खानापूर : खानापूर तालुक्यातील शिंपेवाडी, गुंजी आणि सावरगाळी या तीन गावांतील तब्बल नऊ घरे चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री फोडली आहेत. या चोरट्यांनी सावरगाळीतील एका घरातून तब्बल पंधरा लाख रुपये रोख रक्कम, 16 तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीचे दागिने लंपास केले आहेत. सोमवारी सकाळी या घटना उघडकीस आल्या असून …
Read More »बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर माजी आमदार अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड!
बेळगाव : मागील 20 वर्षांपासून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निर्विवाद वर्चस्व असलेले माजी आमदार अरविंद पाटील यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार व विद्यमान संचालक अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचा विजायोत्सव …
Read More »खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर तेलंगणाच्या प्रभारी
खानापूर : खानापूरच्या माजी आमदार व अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे संघटन सृजन अभियानांतर्गत उत्तराखंडनंतर आता तेलंगणाचीही जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. पक्ष संघटनेमधील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे यापूर्वीही अनेक राज्यात संघटना सक्षम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील दहा दिवस त्या तेलंगणाच्या दौऱ्यावर असून त्या …
Read More »स्त्रीरोगतज्ञ असलेल्या डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या लढ्याला यश…
खानापूर : रंजिता प्रियदर्शनी व स्रीरोग्य तज्ञ असलेल्या खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या रजेचे धोरण लागू करून दरमहा एक दिवस पगारी सुट्टी द्यावी अशी मागणी वेळोवेळी सरकारकडे केली होती, पुढे जाऊन ही मागणी अनेक महिलांनी उचलून धरली. दरम्यान सिद्धरामय्या …
Read More »घराची भिंत कोसळून मजूर ठार; खानापूर तालुक्यातील रामापुर येथील दुर्दैवी घटना
कक्केरी : खानापूर तालुक्यातील रामापूर या ठिकाणी घराची भिंत कोसळल्याने एक मजूर मरण पावला. सदर घटना आज सदर घटना आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामापुर गावातील फैयरोझखान, अयूबखान, देवडी यांच्या जुन्या घराचे छप्पर काढून भिंतीला पांढरं रंग देण्याचं काम सुरू असताना भींत …
Read More »सरन्यायाधीशांवर जोडे फेकण्याच्या निंदनीय घटनेचा खानापूर तालुका बार असोसिएशनच्या वतीने निषेध
खानापूर : सरन्यायाधीशांवर जोडे फेकण्याच्या निंदनीय घटनेचा खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. या संदर्भात खानापूर तहसीलदारांना वकील संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. दिल्ली येथील वकील राकेश किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान भारताचे मुख्य सरन्यायाधीश माननीय श्री. बी. आर. गवई यांच्या दिशेने पायातील जोडे …
Read More »तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी आमदार साहेबांच्या सोबत उभी असेन : डॉ. अंजलीताई निंबाळकर
खानापूर : खानापूर तालुक्याच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते हब्बनहट्टी येथे वाल्मिकी मंदिराचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकू नाईक तर स्वागताध्यक्ष नागोजी पाटील हे होते. जांबोटी भागातील हब्बनहट्टी येथे हे एकमेव वाल्मिकी मंदिर उभारण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार अंजलीताई …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta