Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर

प्रतिकूल परिस्थितीतही मराठी शाळांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : आबासाहेब दळवी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढते स्थलांतर, बदलती सामाजिक परिस्थिती आणि इतर विविध कारणांमुळे सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करून मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन …

Read More »

खानापूरात ‘ओअँसिस जननी यात्रा’ : वंध्यत्वग्रस्त दांपत्यांसाठी सुवर्णसंधी

  खानापूर : वंध्यत्वाबाबत जनजागृती निर्माण करणे, आधुनिक वैद्यकीय उपचारांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि गरजू दांपत्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ओअँसिस IVF अँड फर्टिलिटी यांच्या वतीने “ओअँसिस जननी यात्रा” या मोबाईल फर्टिलिटी क्लिनिकचे आयोजन दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत शिवाजी महाराज स्मारक …

Read More »

ग्रामीण विद्यार्थ्यांना अनमोल सोसायटीकडून क्रीडा साहित्याचे वाटप

  खानापूर : बेळगाव येथील अनमोल मल्टीपर्पज सोसायटी यांच्यावतीने खानापूर तालुक्यातील हलशी व हलशीवाडी येथील सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. अनमोल सोसायटीतर्फे दरवर्षी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून, यंदाही …

Read More »

स्व. राजेश नाथाजीराव हलगेकर यांना ताराराणी पी.यू. कॉलेजमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली

  दोन मिनिटे मौन पाळून व्यक्त केली आदरांजली; शैक्षणिक क्षेत्रासाठी मोठी हानी असल्याची भावना खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष स्व. राजेश नाथाजीराव हलगेकर यांच्या दुःखद निधनाबद्दल खानापूर येथील ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण …

Read More »

मलप्रभा पाणीवळवणे प्रकरणावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी; आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी; खानापूर तालुका म. ए. समितीची मागणी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. बैठकीत खानापूर तालुक्यातील पाणी वळवणेसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विषयांवर ठराव मांडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी कळसा-भांडुरा, महादई …

Read More »

तब्बल १९ वर्षांनंतर रंगणार कारलगा श्री महालक्ष्मी महायात्रा!

  २४ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान भव्य धार्मिक सोहळा; पूर्वतयारीला वेग, भूमिपूजन संपन्न खानापूर : खानापूर तालुक्यातील कारलगा, कारलगा हट्टी आणि शिवोली या तीन गावांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची बहुप्रतीक्षित महायात्रा तब्बल १९ वर्षांनंतर २४ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२७ या कालावधीत भव्य स्वरूपात पार पडणार आहे. या ऐतिहासिक …

Read More »

युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण

    बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावांतील मराठी प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मराठी शाळा जगल्यावर मराठी भाषा टिकणार आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून मराठी शाळा वाचविण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील …

Read More »

हालात्री नदीच्या पुलावर तीन फूट पाणी; खानापूर-हेमाडगा मार्गावरील वाहतूक ठप्प

  खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, खानापूर-हेमाडगा मार्गावरील हालात्री नदीच्या पुलावर सुमारे तीन फूट पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला असून, अनेक वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. गेल्या काही …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा कळसा भंडुरा प्रकल्पाचे पाणी पुन्हा एकदा वळविण्याचा घाट घातला आहे तसेच कुसमळी, पारिश्वाड येथून तसेच तालुक्यातील इतर ठिकाणी मलप्रभा नदी …

Read More »

‘आधी तालुक्याची तहान भागवा, मगच इतरत्र पाणी द्या’ : खानापूरच्या पाण्याच्या प्रश्नावर ब्लॉक काँग्रेसची आक्रमक भूमिका

  खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठीच्या सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवूनच उर्वरित पाणी इतर भागांना द्यावे, अशी ठाम भूमिका खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने मांडली आहे. मलप्रभा नदीच्या पाण्याबाबत तालुक्याच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप करत, याप्रकरणी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी मौन सोडावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ब्लॉक काँग्रेसने …

Read More »