Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

खानापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अबनाळी शाळेला दुहेरी विजेतेपद

  खानापूर : खानापूर शहरातील सर्वोदय शाळेच्या पटांगणावर झालेल्या खानापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक तसेच मुलींच्या संघानेही थ्रो बाॅल मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. एकंदरीत मुलांच्या संघाने सतत पाचव्यांदा व मुलींच्या संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवत थ्रो बॉल क्रीडा प्रकारातील आपले वर्चस्व कायम …

Read More »

खानापूर वकील संघटनेचा नगरपंचायतीच्या कर्मचारी युनियनला पाठींबा

  सी ओ. ची हकालपट्टी हाच निर्णय ऍड. ईश्वर घाडी खानापूर : खानापूर नगरपंचायतींचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांच्या मनमानी कारभाराला स्वच्छता कामगार, नगरपंचायतींचे कर्मचारीवर्ग कंटाळले. त्यामुळेच स्वच्छता कामगार युनियनने शुक्रवारी सकाळपासून नगरपंचायतींच्या कार्यालयाला टाळे टोकून आंदोलन छेडले. त्या आंदोलनाला खानापूर तालुका वकील संघटनेचा पाठिंबा व्यक्त करत नगरपंचायतींचे चीफ …

Read More »

रामनगर बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिन मोठ्या उत्साहाने संपन्न

  खानापूर : रामनगर येथील बापूजी ग्रामीण विकास समितीचे पदवीपूर्व महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय क्रिडा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. श्री. राजेश देसाई यानी प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाला चालना दिली. सशक्त भारत अंतर्गत राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसरवर शिस्तभंगाची कारवाई करा

  स्वच्छता कामगारांसह कर्मचारी वर्गाकडून नगरपंचायतींच्या समोर धरणे खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतींच्या स्वच्छता कामगारांना वेळेत पगार मिळत नाही. मात्र शहर स्वच्छतेसाठी दररोज वेठीस धरले जाते. यासाठी चीफऑफिसर आर. के. वटारे यांनी वेळेत पगार काढावा, अशी मागणी नगरपंचायतींच्या स्वच्छता कामगारांनी केली. मात्र काही कामगारांचे दोन महिन्याचे, काही कामगारांचे चार महिन्याचे, …

Read More »

खानापूरात पणजी- बेळगाव महामार्गावरील कोर्टजवळ कचऱ्याचे साम्राज्य; संबंधितांचे दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव – पणजी महामार्गावरील खानापूर शहरालगत हलकर्णी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोर्ट जवळ रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास कोर्ट, केएलई काॅलेजच्या विद्यार्थी तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे स्वच्छ भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रयत्न …

Read More »

उद्घाटनापूर्वीच खानापूर तालुका क्रीडा स्पर्धेच्या खेळाना प्रारंभ!

  खानापूर (प्रतिनिधी) : दरवर्षी खानापूर तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा करण्यापूर्वीच गुरुवारी दि. ३१ रोजी येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या पटांगणावर उद्घाटन सोहळ्याला फाटा देऊन सांघिक खेळ खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रोबाॅल आदी खेळाना प्रारंभ झाला. एकीकडे तालुकास्तरीय प्राथमिक माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात आमदारांच्या …

Read More »

जांबोटी – चिखलेजवळ ट्रक अपघात; वाहतूक ठप्प

  खानापूर : बेळगाव – चोर्ला मार्गावरील चिखले गावाजवळ आज पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक बसून अपघात झाला आहे. या अपघातामुळे जांबोटी- चोर्ला मार्गावरील गोव्याला जाणारी वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यातच आडवे झाल्याने क्रेनच्या सहाय्याने ते बाजूला …

Read More »

खानापूरात गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ

  खानापूर : राज्यात काँग्रेसचे सरकार येताच पाच हमी योजनाचा शुभारंभ करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिले होते. त्यांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी बुधवारी दि. ३० रोजी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायत, नगरपंचाय आदी कार्यालयात आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने खानापूर शहरातील नगरपंचायतीच्यावतीने रेल्वे स्टेशन रोडवरील समुदाय भवनात …

Read More »

खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करा

  तालुका म. ए. समितीचे मुख्यमंत्री, पालकमंत्र्याना तहसीलदाराव्दारे निवेदन खानापूर : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सुरूवातीला पाऊसच झाला नाही. सध्या तर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील भात पिके, उस पिके पावसाविना वाळत चालली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री यांनी खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर …

Read More »

खानापूर नगरपंचायतीचे विद्यानगरातील रस्ते, गटारींकडे साफ दुर्लक्ष, रहिवाशातून नाराजी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ते, गटारी, कामाकडे खानापूर नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. याबाबतीत संबंधित नगरसेवक, चीफ ऑफिसर उदासीन आहेत. यंदाच्या पावसाळ्यात गटारी नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. पावसाळ्यात रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळे निसरड झाली होती. या चिखलामुळे …

Read More »