Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

खानापूर तालुक्यातील प्राथमिक-उच्च माध्यमिक शाळा आणि पीयू महाविद्यालयांना आज सुट्टी!

    बेळगाव : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मंगळवारी (25 जुलै) खानापूर तालुक्यातील प्राथमिक-उच्च माध्यमिक शाळा आणि पीयू महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. खानापुरा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा आणि पीयू महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Read More »

खानापूर तालुक्यात पावसाचे थैमान; घराची पडझड, लाखोचे नुकसान

  खानापूर : खानापूर तालुका हा अति पावसाचा तालुका अशी ओळख आहे. गेल्या आठवड्यापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने नदी, नाल्यासह, तलावाना पूर आला आहे. शिवारात पाणीच पाणी झाल्याने सर्वच पीके पाण्याखाली गेली आहेत. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील खेड्यात घरांना गळती लागुन घराच्या भिंती …

Read More »

गर्लगुंजी ग्रा. पं. अध्यक्षपदी सौ. ललिता कोलकार, उपाध्यक्षपदी सौ. रेखा कुंभार यांची निवड

  खानापूर : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील ३० महिन्याच्या कालावधीसाठी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड सोमवारी दि. २४ रोजी ग्राम पंचायतीच्या सभागृहात पार पडली. यावेळी गर्लगुंजी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण एस सी महिला गटासाठी आले होते. तर उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सामान्य महिला गटासाठी आले …

Read More »

मेरडा- करजगी रस्त्यावरील तलावाचा बांध ग्रा. पं. अध्यक्षांच्या दक्षतेने बचावला!

  खानापूर : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मलप्रभा नदीसह नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याच्या प्रवाहामुळे बंद झाले आहेत. तालुक्यातील मुसळधार पावसामुळे हालगा ग्राम पंचायत हद्दीतील मेरडा -करजगी रस्त्यावरील मोठा तलाव काठोकाठ भरून ओसंडत असताना तलावाचा मोठा बांध फुटला जात असल्याची घटना हलगा ग्राम …

Read More »

मलप्रभा नदीपात्रात पडलेला बैल 10 कि.मी. अंतरावर सापडला!

  खानापूर : पावसाने सध्या सर्वत्र थैमान मांडले आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. शेतीच्या कामाला देखील वेग आलेला आहे. मलप्रभा नदी काठावरील शेतात चरण्यासाठी सोडलेला बैल पाय घसरून नदीपात्रात पडला. मात्र या बैलाने मोठ्या धाडसाने दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून जवळपास दहा किलोमीटर अंतर पोहत जाऊन स्वतःचा जीव वाचण्याची घटना …

Read More »

लोंढा महामार्गावरील पुल कोसळला

  खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या सहा दिवसापासून सतत होत असलेल्या पावसाने सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. लोंढ्या जवळ नव्याने बांधण्यात आलेला पूल खचला आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. लोंढ्या जवळ नव्याने बांधण्यात आलेला पूल आज रविवारी सकाळी एका बाजूने खचला असल्याचे दिसून आले …

Read More »

खानापूर तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, रस्ते गेले वाहून

  खानापूर : खानापूर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तर कुसमळी जवळील मलप्रभा नदीच्या प्रवाहात बैल वाहुन गेल्याची घटना घडली आहे. खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. गेल्या आठ दिवसापासून पावसाची मुसळधार हजेरी सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या, नाल्यानी पाण्याची …

Read More »

कुसमळीनजीक मलप्रभा नदीच्या पात्रातून बैल गेला वाहून!

  खानापूर : सध्या खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील घनदाट जंगलात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कणकुंबी, जांबोटी भागातील मलप्रभा नदी नदीपात्र ओसंडून वाहत आहे. मलप्रभा नदीला पूर आला आहे. या भागात भात रोप लागवडीसाठी लगबग सुरू असतानाच हब्बनहट्टी (ता. खानापूर) संतोष घाडी हे आपल्या …

Read More »

पावसामुळे लोंढा मार्गावर मोहिशेतनजीक नव्याने बांधलेला ब्रिज खचला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा येथे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे लोंढ्यातील वीज प्रवाह खंडित झालेला आहे. त्याशिवाय लोंढा मार्गावर मोहिशेतनजीक नव्याने बांधलेला ब्रिज खचला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे लोंढा गावातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. …

Read More »

गर्लगुंजी प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीच्या निवडणुकीत श्री माऊलीदेवी शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील तालुक्यातील सर्वात जुनी पीकेएस सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीची खानापूर तालुक्यात चुरशीची निवडणूक म्हणून सर्वाचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत दोन पॅनल तयार झाले होते. यामध्ये जुने संचालक असलेले पॅनल श्री माऊली देवी शेतकरी विकास पॅनल व शेतकरी विकास पॅनल …

Read More »