Monday , September 21 2026
Breaking News

माजी सैनिक मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने ॲम्बुलन्स सेवेस प्रारंभ

Spread the love

 

खानापूर : माजी सैनिक मल्टीपर्पज को ऑप सोसायटी लि खानापूरच्या वतीने 77 वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेच्या वतीने ॲम्बुलन्स सेवाही‌ सुरू करण्यात आली.

संस्थेचे चेअरमन जयराम पुंडलिक पाटील यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सोसायटी कर्मचारी उपस्थीत होते. त्यानंतर बाल सुधार गृह खानापुर येथे जाऊन सर्व विद्यार्थ्यांना वही-पेन व मिठाई वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे अवचित साधून रुग्ण सेवा करण्यासाठी संस्थेच्या वतीने ॲम्बुलन्स सेवेचे उदघाटन करण्यात आले. ॲम्बुलन्स सेवेसाठी जयंत काद्रोळकर आणी विष्णु काद्रोळकर यांचे योगदान मिळाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *