Tuesday , December 3 2024
Breaking News

चिकोडी

सदलगा नगरपरिषदेकडून ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नियोजन बैठक

  सदलगा : येथील नगरपरिषदेच्या मल्लिकार्जुन कल्याण मंटप या सांस्कृतिक भवनात सदलगा नगरपरिषदेकडून ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नियोजन बैठक आयोजित केली होती. या नियोजन बैठकीस नगराध्यक्ष अभिजीत पाटील, मुख्याधिकारी के. के. गावडे, बी. एस. गुरव (समुदाय संघटना अधिकारी), नगरसेवक राजू अमृतसम्माण्णावर, अनिल डेक्कन्नावर, पी. बी. गरदाळे, विजय कोकणे, भरत बोरगांवे, …

Read More »

सदलग्यातील ड्रेनेज प्लँटला शासकीय अधिकाऱ्यांची भेट : संतप्त शेतकऱ्यांनी विचारले प्रश्न

सदलगा : सदलग्यातील भूमीगत सांडपाणी व्यवस्थेचे ड्रेनेज प्रक्रिया केंद्राला कर्नाटक शासकीय अधिकाऱ्यांनी आज भेट दिली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रो. मोहनकुमार आणि प्रो.राव, केयुडब्ल्युएस धारवाडचे मुख्य अभियंता श्री. टी. एन्. मुद्दुराजण्णा, केयुडब्ल्युएस बेळगांवचे कार्यकारी अभियंता सुरेश मोरवाल, केयुडब्ल्युएस चिकोडीचे सहायक कार्यकारी अभियंता आर के उमेश आदींचा या अधिकाऱ्यांमध्ये समावेश होता. …

Read More »

सदलग्यातील दूधगंगेवरील जुना पूल ढासळला; किसान पूलही बनत आहे कमकुवत

  सदलगा : सदलगा येथील दूधगंगा नदीवरील जुना पूल दूधगंगेच्या प्रवाहामुळे ढासळला. या पुलाच्या पूर्व-दक्षिण रस्त्याला जोडणाऱ्या बांधकामाच्या दक्षिणेकडील बाजूस भिंतीवरील कोरलेल्या पण पुसट झालेल्या नोंदीनुसार तत्कालीन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री एस्. निजलिंगाप्पा यांच्या हस्ते १९५९ सारी या पुलाचे उद्घाटन झाले होते. हा पूल म्हणजे बंधारा वजा पूल पण सदलगा, एक्संबा, …

Read More »

येडूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा संशय

  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावात बिबट्या आल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यावरून वनविभागाचे अधिकारी शोध घेत आहेत. येडूरसह आजूबाजूच्या गावात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने वास्तव्य केल्याच्या वृत्ताने स्थानिक ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येडूर गावातील जाधव यांच्या शेतात बिबट्या …

Read More »

येडूरवाडीच्या बीएसएफ जवानाचा प. बंगालमध्ये अपघाती मृत्यू

  अंकली : येडूरवाडी (ता. चिकोडी) येथील रहिवासी व सध्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेल्या जवानाचा पश्चिम बंगाल येथे अपघाती मृत्यू झाला. सूरज धोंडीराम सुतार (वय 30) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक वर्षाची मुलगी व भाऊ असा परिवार आहे. अंकलीजवळील येडूरवाडी येथील जवान सीमा …

Read More »

हिडकल डॅममध्ये युवकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून

हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम गावात अज्ञात मारेकर्‍यांनी एका युवकाचा चाकूने वार करून निर्घृण खून करून मृतदेह फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम गावात राहणार्‍या परशुराम हलकर्णी नावाच्या 32 वर्षीय युवकाचा खून झाला आहे. गावातील अंजनेय मंदिराजवळ काही हल्लेखोरांनी चाकूने वार करून हत्या करून फरार …

Read More »

चिक्कोडी तालुक्यातील 4 बंधारे पाण्याखाली

चिक्कोडी : महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे थैमान सुरूच आहे. त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील 4 पूल पाण्याखाली बुडाले आहेत. महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आता चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व तिच्या उपनद्या वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत क्षणोक्षणी वाढ होत आहे. त्याशिवाय यडूर-कल्लोळ, मांजरी-सौंदत्ती, मलिकवाड-दत्तवाड, एकसंबा-दानवाड हे 4 …

Read More »

हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये महिलेचा खून करून दागिने लंपास

हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये घरात एकट्या असलेल्या महिलेचा खून करून दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गावातील निवृत्त पीएसआय भीमराय अक्कतंगेरहाळ यांची दुसरी पत्नी मालुताई या घरात एकटी असल्याचे पाहून दरोडेखोरांनी त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने लुटले. या घटनेने होसूर गावात एकच …

Read More »

साने गुरुजी हे थोर स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते : प्रा. एम. एल. कोरे

शिवानंद महाविद्यालयातील मराठी विभागात साने गुरुजींची पुण्यतिथी साजरी कागवाड : भारतीय स्वातंत्र्यसैनिक, सामाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी साहित्यिक म्हणून प्रचलित असणारे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरूजी. दुसर्‍यांना हसवणे सोपे असते. मात्र, दुसर्‍यांसाठी रडणे हे तितकेच अवघड आहे. त्यासाठी अंतकरण लागते अशी शिकवण देणार्‍या आणि आपणास प्रिय असणार्‍या साने …

Read More »

जैनापूरनजीक सैनिक टाकळीच्‍या दाम्‍पत्‍याला डंपरची धडक, पत्‍नी ठार, पती जखमी

चिकोडी : डंपर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि. ४) दुपारी जैनापूरनजीक घडली. ज्योती राहुल शिरट्टी (वय २८, रा. सैनिक टाकळी) असे मृत पत्‍नीचे नाव असून राहुल शिरटी (वय ३२) असे जखमी पतीचे नाव आहे. अपघातानंतर डंपर चालक घटनास्‍थळावरुन पसार …

Read More »