Sunday , July 26 2026
Breaking News

चिकोडी

हिरेकोडी येथे लग्न समारंभात अन्नातून विषबाधा; १०० हून अधिक अत्यवस्थ

  चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात लग्न समारंभातील जेवण जेवल्यानंतर विषबाधा होऊन १०० हून अधिक जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याची घटना घडली. झाकीर पटेल यांच्या मुलीचे काल लग्न झाले. या पार्श्वभूमीवर हिरेकोडी गावाच्या शिवारात भव्य भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. विवाह सोहळ्यात सहभागी होऊन घरी परतलेल्या …

Read More »

चिक्कोडी येथे विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

  चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे विद्युत तारा दुरुस्त करताना खांबावर चढलेल्या एका व्यक्तीला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, चिक्कोडी येथे हेस्कॉमचे कर्मचारी विद्युत वाहिनी दुरुस्त करत असताना सिद्धराम नामक व्यक्तीला खांबावर चढवले असता त्याला विजेचा धक्का बसला आणि त्याचा …

Read More »

मंगसुळीत राष्ट्रीयीकृत बँकेची मागणी

  कागवाड : मंगसुळी येथे कर्नाटक विकास ग्रामीण बँक ही एकमेव बँक असून येथील सर्व आर्थिक व्यवहार याच बँकेमध्ये चालतात. सदर बँकही अपुल्या जागेत असून बँकेत कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहाराला अडचण होत आहे. यासाठी प्रत्येक विभागाचे वेगवेगळे काऊंटर करून कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत …

Read More »

जैन मुनींना एकता सोशल फाउंडेशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

  बेळगाव : हिरेकुडी येथील नंदी पर्वत आश्रमाचे जैन मुनी श्री 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या झालेल्या क्रूर हत्येचा निषेधार्ह व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, यासाठी मांजरी ता. चिक्कोडी येथील एकता सोशल फाउंडेशनच्या वतीने मांजरी बस स्थानकाजवळ भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्री 108 कामकुमार नंदी महाराजांच्या भावप्रतिमेचे पुजा डॉ. …

Read More »

नदीतील पंपसेट काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील मलिकवाड गावाजवळ दूधगंगा नदीतून मोटार पंपसेट काढण्याच्या प्रयत्नात एका शेतकऱ्याचा विजेच्या तारेला धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना घडली. वडागोळ गावातील अण्णाप्पा नायडू खोत (४२) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मलिकवाड गावाजवळ दूधगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने शेतकरी आण्णाप्पा खोत हे एका सहकाऱ्यासह मोटार पंपसेट …

Read More »

वाळूने भरलेली लॉरी पलटी; सुदैवाने बचावला लॉरी चालक

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावाजवळ निपाणी-मुधोळ राज्य महामार्गाच्या कडेला उभी असलेली वाळूने भरलेली लॉरी स्वतःहून पलटी होऊन लॉरी चालक सुखरूप बचावला. यरगट्टीहून निप्पाणीकडे वाळूची वाहतूक करणाऱ्या चन्नाप्पा गोविंदप्पागोळ या चालकाने रस्त्याच्या कडेला टिप्पर न्युट्रल करून खाली उतरला होता . अचानक हा टिप्पर महामार्गालगत उलटला. सुदैवाने चालक या वाहनातून …

Read More »

कब्बूर- बेल्लद बागेवाडी रस्त्यालगत आढळला मृतदेह; खूनाचा संशय

  चिक्कोडी : कब्बूर ते बागेवाडी दरम्यान असलेल्या कालव्यानजीक एकाचा खून करुन मृतदेह टाकण्यात आलेला प्रकार उघडकीस आला आहे. कब्बूर ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या शिरहट्टीकोडी येथील रहिवासी भीमाण्णा कल्लाप्पा मुन्नोळी (वय 51) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री खून करुन मृतदेह कब्बूर ते बेल्लद बागेवाडी रस्त्यालगत असलेल्या कालव्या शेजारी टाकण्यात …

Read More »

सदलग्यातून कलबुर्गी (गुलबर्गा) एसटी बस सुरू

  सदलगा : सदलगा येथून आजपासून कलबुर्गी (गुलबर्गा) कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ कलबुर्गी विभाग क्रमांक २ कडून कलबुर्गी – निपाणी ही एस टी बस सेवा सुरु करण्यात आली. विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून ही बस सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती कर्नाटक राज्य मार्ग परिवहन …

Read More »

सदलगा येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये सांडपाण्यामुळे दलदल

  सदलगा : येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये शहराच्या उत्तरेकडील बस स्थानकाच्या बाजूने उतारावरुन गटारीतून येणारे सांडपाणी राणी चन्नम्मा सर्कलमध्ये तुंबुन राहते त्यामुळे तिथे तेलसंग यांच्या प्लॉट समोर दलदल निर्माण झाली आहे. घाणीने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डुकरांचा मुक्त संचार सुरू असतो. याच परिसरात ज्योती बाजार, कर्नाटकाचा अभिमान, राणी चन्नम्माच्या पुतळ्याची …

Read More »

चिक्कोडी पोलीस उपाधीक्षकांची अशीही माणुसकी!

  अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्याला स्वतःच्या वाहनातून केले रुग्णालयात दाखल निपाणी (वार्ता) : पोलीस प्रशासनाबद्दल नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा झाला आहे. पण पोलिसाकडेही माणुसकी असल्याचे चित्र शुक्रवारी (ता.९) रात्री साडेसात वाजता सुमारास दिसून आले. पट्टणकुडी येथील रस्त्यावर दुचाकीवर जाणाऱ्या दाम्पत्यांचा अपघात होऊन ते रस्त्यावर पडले होते. पण मदतीसाठी कोणीच न …

Read More »