चिक्कोडी : नजीकच्या पट्टणकुडी (ता. चिक्कोडी) येथे पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ७) सायंकाळी घडली. सक्षम भरतेश उपाध्ये असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे. घटनेची नोंद खडकलाट पोलिसात झाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, उपाध्ये कुटुंब यांचे जैन बस्ती परिसरात घर आहे. …
Read More »कर्नाटक दहशतवाद्यांसाठी अड्डा बनल्याचा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा थेट आरोप
चिक्कोडी : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चिक्कोडी येथे आयोजित बूथ स्तरावरील कार्यकर्ता संमेलनात कर्नाटक राज्य दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचा थेट आरोप केला. चिक्कोडी येथे भाजप बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनात आलेले भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना रॅलीच्या माध्यमातून व्यासपीठावर आणण्यात आले. भाजपच्या बूथ-स्तरीय …
Read More »ननदीवाडी येथे अठरा गुंठ्यात दहा टन वांग्याचे विक्रमी उत्पादन
चिकोडी : चिकोडी तालुक्यातील ननदीवाडी येथील प्रगतिशील शेतकरी श्री सदाशिव श्रीपती वंजीरे व ओंकार वंजीरे यांनी आपल्या 18 गुंठे जमिनीमध्ये सहा महिन्यात तब्बल 10 टन इतके वांग्याचे विक्रमी उत्पादन घेतले. यावेळी बोलताना सदाशिव वंजीरे म्हणाले, वांग्याच्या झाडाची उंची सरासरी सहा ते सात फूट इतकी आहे. सध्या वांग्याच्या बागेमध्ये अजून …
Read More »सदलगा नगरपालिका पोटनिवडणूकीत चारही प्रभाग काँग्रेस समर्थक गटाकडे
नगरपालिकेवर काँग्रेसच्या सत्तेचे संकेत; काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष सदलगा : चिकोडी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या सदलगा पोटनिवडणूकीत चारही प्रभागांवर काँग्रेस समर्थकांनी बाजी मारली. प्रतिष्ठेची ठरलेल्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये काँग्रेसचे उमेदवार बसवराज गुंडकल्ले यांनी १२६ मताधिक्य मिळवून महांतेश देसाई यांना पराभूत केले. विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि चिक्कोडी सदलगा …
Read More »चिकोडीत डॉ. आंबेडकर पदवीव्युत्तर केंद्र सुरू करा
लक्ष्मण चिंगळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती सुरू आहे. त्यामध्ये आणखीन भर पडावी. यासाठी बेळगाव राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत चिक्कोडीत डॉ. बी. आर. आंबेडकर पदव्यत्तर केंद्र सुरू करावे, या मागणीचे निवेदन खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी मुख्यमंत्री …
Read More »जिल्हा मागणीसाठी चिकोडीकर रस्त्यावर!
मानवी साखळी करुन निदर्शने; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करुन स्वतंत्र चिकोडी जिल्ह्याची घोषणा करण्याच्या मागणीसाठी चिकोडीत भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. अथणी जिल्ह्याची मागणी योग्य नसून पूर्वीपासून मागणी असलेल्या चिकोडी जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. चिकोडी संपादना स्वामींच्या नेतृत्वाखाली जिल्हा आंदोलन …
Read More »डॉ. चारुदत्त कासार यांना पीएचडी प्रदान
निपाणी (वार्ता) : चिकोडी तालुका शिक्षण संस्थेच्या श्रीमती ए. ए. पाटील महिला महाविद्यालयातील मराठीचे प्रा. डॉ. चारुदत्त भालचंद्र कासार यांना धारवाड येथील कर्नाटक विश्वविद्यालयाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. धारवाड येथे झालेल्या पदवीदान समारंभामध्ये विद्यापीठाचे कुलाधिपती व राज्यपाल डॉ. थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते पदवी प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. …
Read More »बद्रीकेदारची सायकल यात्रा करुन सदलग्याचा प्रविण मडिवाळ स्वग्रामी सुखरूप परत
सदलगा : येथील प्रविण इराप्पा मडिवाळ (वय २२ वर्षे) आणि त्याचा मित्र गौरव पाटील (म्हाकवे, ता. कागल) असे दोघेजण २५ सप्टेंबर रोजी सदलगा आणि म्हाकवे येथून बद्रीनाथ, केदारनाथकडे सायकल प्रवासासाठी निघाले होते. पहिला मुक्काम त्यांनी कराडमध्ये केला होता. दोघेही तरुण दररोज सुमारे १२० ते १३० किमी चा प्रवास करत, …
Read More »कार-दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात; भाऊ-बहीण ठार
बेळगाव : देवदर्शनासाठी चिक्कोडीकडे जात असताना कारची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात भाऊ-बहीण जागीच ठार झाले. मलिकवाड – नणदी रस्त्यावरील शर्यतीमाळजवळ मंगळवारी हा अपघात झाला. प्रशांत तुळशीकट्टी (वय २०) आणि प्रियांका तुळशीकट्टी (वय १९) अशी मृतांची नावे आहेत. प्रशांत व त्याची बहीण प्रियांका हे दोघे दुचाकीने चिक्कोडीला परटी …
Read More »माजी सैनिकाचा गळा आवळून खून; चिक्कोडी तालुक्यातील घटना
चिक्कोडी : बहिणीच्या नवऱ्याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मेहुण्याने दाजीचा गळा आवळून खून केल्याची घटना चिक्कोडी शहरातील विद्यानगरमध्ये घडली. जैनापूर गावातील माजी सैनिक आणि क्रशर मालक इरगौडा शिवपुत्र टोपगोळ (४५) याचा मृत्यू झाला आहे. चिक्कोडी शहरातील विद्यानगर येथील राहत्या घरी त्याची हत्या करण्यात आली. मेहुणा संजय भाकरे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta