Sunday , December 7 2025
Breaking News

चिकोडी

चिक्कोडीजवळ कारमधील सिलिंडरचा स्फोट

  चिक्कोडी : व्यवसायानिमित्ताने चिक्कोडी येथे आलेल्या कुटुंबियांच्या कारमध्ये सिलिंडर स्फोट झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या गावातून चिक्कोडी येथे माता – शिशु रुग्णालयासमोर टेन्ट घालण्यासाठी सदर कुटुंब आपल्या वॅगन आर कार मधून आले होते. दरम्यान कारमधील सिलिंडरचा स्फोट होऊन कारमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून ज्ञानसिंग कलासिंग चितौड यांचे …

Read More »

कोलकाता येथील घटनेचा चिक्कोडीतील डॉक्टरांचे आंदोलन

  चिक्कोडी : कोलकाता येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध करत चिक्कोडी येथे डॉक्टरांनी निदर्शने केली. चिक्कोडी शहरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चिक्कोडी शहर व तालुक्यातील डॉक्टर व नर्सिंगचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सार्वजनिक रुग्णालयापासून सुरू झालेली निषेधची रॅली राणी चन्नम्मा …

Read More »

बेडकिहाळ येथील उषाराणी हत्तीणीचा मृत्यू

  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील कोथळी गावातील आचार्यरत्न श्री 108 देशभूषण महाराज यांच्या कुप्पनवाडी शांतीगिरी आश्रमातील उषाराणी नावाच्या हत्तीणीचा वयाच्या 51 व्या वर्षी शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बेडकिहाळ गावात 1971 मध्ये सर्केबैल (शिमोगा) येथून वयाच्या 6 व्या वर्षी एक हत्ती आणण्यात आला होता. बेडकिहाळ गावचे संदीप पोलीस पाटील यांच्या …

Read More »

नागरमुन्नोळीजवळ कार आणि मालवाहू यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू

  नागरमुन्नोळी : बेळगाव जिल्ह्यातील नागरमुन्नोळीजवळील बेळकोढ गेटजवळ कार आणि मालवाहू यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर हा अपघात झाला असून राकेश वाटकर (23) आणि सौरभ कुलकर्णी (22, रा. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत चार जण जखमी झाले असून जखमींना …

Read More »

पुराचा पहिला बळी; कृष्णा नदीतून वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला!

  चिक्कोडी : तालुक्यातील पहिला बळी कृष्णा नदी ओसंडून वाहत आहे. याच दरम्यान २९ जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची येथील एक शेतकरी कृष्णा नदीत वाहून गेल्याची माहिती मिळाली होती आज वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. संतोष सिद्धप्पा मैत्री (41) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी …

Read More »

पूर पाहण्यासाठी सदलगा शहरातील दूधगंगा नदी आणि दत्तवाड पुलावर लोकांनी केली गर्दी

  महापूर पाहण्यास येणाऱ्या सर्व जनतेला प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा चिक्कोडी : सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीला आता खूपच मोठा महापूर आल्याने सदलगा शहरातील अनेक स्त्रिया, लहान थोर मंडळी, पुरुष, तरुण वर्ग मोठ्या संख्येने व गटागटाने दूधगंगा नदी किनारी फार मोठी गर्दी करून महापूर पाहण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जात आहेत. त्याचबरोबर दत्तवाड …

Read More »

सदलगा शहर परिसरातील दूधगंगा नदीच्या पूर परिस्थितीचा एनडीआरएफ टीमने घेतला आढावा

  चिकोडी : चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहराजवळून वाहत असणाऱ्या दूधगंगा नदीला मोठा पूर आला असून, सदलगा शहर परिसरातील शेतमाळ्यात पाणी शिरले आहे. किसान ब्रिज खालून देखील पाणी वाहत आहे. या दूधगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे नदीची पाणी पातळी तासातासाला वाढत आहे. त्यामुळे सदलगा शहरातील दाखल झालेल्या एनडीआरएफ टीमने …

Read More »

कृष्णा नदीला पूर; कुडची पुल पाण्याखाली!

  चिक्कोडी : चिक्कोडी आणि महाराष्ट्रातील संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीवरील कुडची पुलाला पूर आला आहे. जमखंडी व उगार यांना जोडणारा कुडची पूल पाण्याखाली गेल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. कुडची पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आधीच रस्ता बंद करून कारवाई केली आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम म्हणून दूधगंगा नदीच्या …

Read More »

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हाच दत्त कारखान्याचा ध्यास

  सदलगा शहरातील प्रचार सभेत माननीय उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे मत सदलगा : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिरोळच्या २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांसाठी २४ जुलै रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी काल सदलगा शहरातील महादेव मंदिराच्या अक्कमहादेवी कल्याण सभा मंडपात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांच्या समवेत प्रचार सभा …

Read More »

संभाव्य पुराच्या धोक्यामुळे शेकऱ्यांकडून जनावरे सुरक्षित स्थळी स्थलांतरित

  चिक्कोडी : महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधगंगा पाणी पातळीत वाढ झाली आहे. एकसंबा परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एकसंबा -दत्तवाड परिसरातील शेतकरी आपली जनावरे अन्यत्र सुरक्षित स्थळी स्थलांतरित करत आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा, दुधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे …

Read More »