आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीचे आगार प्रमुखांना निवेदन कोगनोळी : कागल ते हदनाळ अशी बससेवा सुरु करावी अशा मागणीचे निवेदन हदनाळ-आप्पाचीवाडी ग्रामस्थांच्यावतीने कागल आगार प्रमुखांना देण्यात आले. निवेदनात पुढे म्हंटले आहे, आप्पाचीवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील हदनाळ गाव हे बहुभाषिक मराठी असून येथील विद्यार्थी व प्रवासी हे कागलला दररोज ये-जा करीत आहेत. तरी कागल …
Read More »मोबाईल चार्ज करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
बेळगाव : मोबाईल चार्ज करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे घडली. 27 वर्षीय आकाश शिवदास संकपाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. श्रीपेवाडी, निपाणी औद्योगिक परिसरात राहणारे आकाश हा घरी मोबाईल चार्ज करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. …
Read More »निपाणीतील बगाडे प्लॉट येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरी
निपाणी (वार्ता) : शहरातील उपनगरतील बगाडे प्लॉटमधील बंद असलेला बंगला फोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची घटना घडली. घर मालक बाहेरगावी नोकरीसाठी असल्यामुळे चोरांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र किरकोळ लहान मुलांचे दागिने चोरांनी लंपास केले आहेत. याबाबत घटनास्थळावर समजलेली माहिती अशी, बगाडे प्लॉट येथे सरताज इचलकरंजे यांचा बंगला आहे. …
Read More »गृहलक्ष्मी योजसाठी बँक पासबुक आधार लिंकसाठी बँकांमध्ये गर्दी
सर्व्हर डाऊनचा फटका; दिवसभर नागरिकांच्या रांगा निपाणी (वार्ता) : गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्य योजनेला प्रारंभ झाला असून गावागावांतून नोंदणीकरण आणि पासबुक काढण्यासाठी गर्दी होत आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील बापूजी सेवा केंद्र आणि ग्रामवन मधून गर्दी होत आहे. परंतु, सर्व्हर डाऊनचा फटका अनेकठिकाणी बसत आहे. त्यामुळे दिवसभर बँका आणि इतर ठिकाणी रांगा …
Read More »दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ असणाऱ्या दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. निपाणी व कागल तालुक्यात पाऊस थोडा कमी असला तरी कोकण पट्ट्यात पावसाचा जोर असल्याच्या कारणाने दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. …
Read More »निपाणी शहरातील गुळगुळीत रस्त्यावर पडले खड्डे!
पहिल्या पावसातच दर्जा उघड ; वाहनधारक, नागरिकांत संताप निपाणी (वार्ता) : शहरात कोट्यवधी रुपये खर्चाच्या चकचकीत रस्त्यावरून जाताना पुढे कोणत्याही ठिकाणी खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागू शकतो, अशी परिस्थिती निपाणी शहरातील आहे. त्यामुळे वाहनधारक, त्यांची वाहने, पायी चालणारे नागरिक चिखलाने माखून घरी येणार नाहीत, याची काही शाश्वती नाही. अनेक …
Read More »महाराष्ट्राच्या पावसाने सीमाभागात पूर
पाच नद्यांना वाढले पाणी : ३६ गावांना वाढला धोका निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील महाबळेश्वर, वारणा, राधानगर, अंबा, धूम, नवजा, काळमावाडी, कोयना आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील नद्यांची पाणी पातळी वाढून नदीकाठच्या गावामध्ये पूर येत आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्यामुळे कर्नाटक सीमाभागातील ३६ गावांना धोका पोहोचण्याची …
Read More »मणिपूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्वपक्षीय संघटनेतर्फे निषेध
निपाणी (वार्ता) : मणिपूर येथे दोन महिलांवर अत्याचार करून त्यांची सार्वजनिक ठिकाणी विटंबना करण्यात आली. त्यासंदर्भात येथील विविध सर्वपक्षीय संघटनांनी सीटू कार्यालयात एकत्रित येऊन या घटनेचा तीव्र निषेध करून संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या निंदनीय घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.२७) सकाळी अकरा वाजता येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात …
Read More »शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दुरुस्ती करा
शहरवासीयांची मागणी; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : शहरातील चोरीसह समाजविघातक कृत्ये टाळण्यासाठी काही महिन्यापुर्वी निपाणी व परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. पण त्यापैकी बहुतांश कॅमेरे अनेक दिवसापासून बंद पडलेले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरामध्ये चोरीच्या घटना वाढत आहेत. चोरट्यांचा पोलीस खात्याला शोध घेण्यासाठी अडथळा निर्माण …
Read More »यरनाळ ग्रामपंचायत अध्यक्षपदी लक्ष्मीबाई कांबळे तर उपाध्यक्षपदी दिग्विजय निंबाळकर
निपाणी (वार्ता) : तवंदी, अंमलझरी, गव्हाण आणि यरनाळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी अंमलझरीच्या लक्ष्मीबाई आकाराम कांबळे तर उपाध्यक्षपदी यरनाळ येथील दिग्विजय निंबाळकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून निपाणी नगरपालिकेचे आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी काम पाहिले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. नूतन अध्यक्ष लक्ष्मीबाई कांबळे यांनी, सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta