Wednesday , April 22 2026
Breaking News

मणिपूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्वपक्षीय संघटनेतर्फे निषेध

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : मणिपूर येथे दोन महिलांवर अत्याचार करून त्यांची सार्वजनिक ठिकाणी विटंबना करण्यात आली. त्यासंदर्भात येथील विविध सर्वपक्षीय संघटनांनी सीटू कार्यालयात एकत्रित येऊन या घटनेचा तीव्र निषेध करून संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या निंदनीय घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.२७) सकाळी अकरा वाजता येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात निषेध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कॉ. चंद्रकांत खराडे, अल्पसंख्यांक संघटनेचे जरारखान पठाण यांनी, मणिपूर मध्ये घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. असे कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. यापुढे काळात अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने जागृत राहणे आवश्यक आहे. घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वांनी निषेध सभेस येण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रा. एन. आय. खोत, प्रसन्नकुमार गुजर, कॉ. परविन नाईकवाडे, कॉ. अनिल ढेकळे, टी.के. पाटील, सुधाकर माने, जयसिंग कांबळे, किरण कांबळे, धनाजी कांबळे, नेताजी कोळी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *