Saturday , April 18 2026
Breaking News

कागल-हदनाळ बससेवा सुरु करण्याची मागणी

Spread the love

 

आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीचे आगार प्रमुखांना निवेदन
कोगनोळी : कागल ते हदनाळ अशी बससेवा सुरु करावी अशा मागणीचे निवेदन हदनाळ-आप्पाचीवाडी ग्रामस्थांच्यावतीने कागल आगार प्रमुखांना देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हंटले आहे, आप्पाचीवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील हदनाळ गाव हे बहुभाषिक मराठी असून येथील विद्यार्थी व प्रवासी हे कागलला दररोज ये-जा करीत आहेत. तरी कागल आगाराची कागल-हदनाळ अशी बस सोडून विद्यार्थ्यांची व प्रवाशांची सोय करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दुपारी ठीक ४.३० वाजता ही बस पाठवून देऊन प्रवाशांना व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
कागल आगार प्रमुखांनी हे निवेदन स्विकारुन बससेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाडेकर यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ममदापूर (के. एल.) अंबिकादेवी यात्रेनिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमासह शर्यतींचे आयोजन

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *