Friday , November 22 2024
Breaking News

निपाणी

निपाणीत शुक्रवारी मोफत तपासणी मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

  निपाणी (वार्ता) : बेळगाव के. एल. ई. संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.८) सकाळी १० वाजल्यापासुन दुपारी १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी शिबिर येथील अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी कम्युनिटी …

Read More »

शिक्षकामुळेच समाज व्यवस्थेला दिशा

  गटशिक्षणाधिकारी नाईक; आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण निपाणी (वार्ता) : शिक्षक हे विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देतात. आदर्श नागरिक घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. तो समाजव्यवस्थेला दिशा देणारा मार्गदर्शक गुरू असतो. प्रत्येकाच्या जीवनात आई- वडिलांबरोबरच शिक्षकाचे मोठे महत्त्व आहे, असे मत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. जिल्हा आणि तालुका पंचायत …

Read More »

सेवानिवृत्तीनिमित्त म्हाळुंगे यांचा देवचंद महाविद्यालयामध्ये सत्कार

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालय ग्रंथालयातील कर्मचारी ज्योती म्हाळुंगे यांचा २३ वर्षे सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी जनता शिक्षण मंडळाचे संचालक प्रदीप मोकाशी यांच्या हस्ते व मानपत्र देऊन, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. जी. डी. इंगळे यांच्या हस्ते तर ग्रंथालय विभागाच्या वतीनेही त्यांचा सत्कार …

Read More »

डेंगी सदृश आजाराने निपाणीत युवकाचा मृत्यू

  निपाणी (वार्ता) : डेंगी सदृश आजाराने निपाणीतील प्रगती नगरमधील युवकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.५) सायंकाळी घडली सौरभ राजू माने (वय २६) असे या युवकाचे नाव आहे. सौरभ माने हा येथे चायनीजचा व्यवसाय करीत होता. आठ दिवसापूर्वी त्याला किरकोळ ताप येऊन रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. त्यामुळे …

Read More »

डॉ. राधाकृष्ण यांचा आदर्श घेऊन काम करावे

  आमदार शशिकला जोल्ले; निपाणीत शिक्षक दिन निपाणी (वार्ता) : आपल्या कारकिर्दीमध्ये शिक्षणाला महत्त्व देऊन निपाणी भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केल्याने शिक्षकांना समाजात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी सर्वपल्ली डॉ. राधाकृष्ण यांचा आदर्श घेऊन काम करावे. शिक्षकांमध्ये देशाचे भविष्य निर्माण करण्याची ताकद आहे, असे मत आमदार शशिकला …

Read More »

दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज; निपाणीत लाखाचे बक्षीस

  श्रीकृष्ण जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : श्रीकृष्ण जयंती उत्सव एक दिवसांवर आणि गोपाळकाला दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने गोपाळकाला सणासह मंडळ व गोविंदा पथके दहीहंडीसाठी सज्ज झाली आहेत. दहीहंडी उत्सवाची अधिक रंगत आणण्यासाठी निपाणी व परिसरातील विविध मंडळाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. जन्माष्टमी बुधवारी (ता. ६) झाल्यावर दुसऱ्या …

Read More »

अंबिका तलावाची ग्रामपंचायतीकडून स्वच्छता

  स्वच्छ ठेवण्याचे आवाहन कोगनोळी : येथील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या अंबाबाई मंदिरालगत तलावातील मासे मृत होऊ लागले होते. याची दखल घेऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून तलावाची स्वच्छता करून घेण्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील म्हणाले, अंबिका तलाव हे गावाचे वैभव आहे. महिलांनी कपडे धुत असताना केमिकल युक्त कपडे व इतर साहित्य …

Read More »

कोल्हापूर बंदच्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यावर बंदोबस्त

  कोगनोळी : जालना येथे मराठा आरक्षण साठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांना पोलिसांच्या वतीने मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा निषेध म्हणून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. कोल्हापूर बंदच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी तालुका निपाणी येथील टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या सर्व सरकारी वाहने टोलनाक्यावरून परत कर्नाटकात पाठवून …

Read More »

सेवनिवृत्ती निमित्त आर. ए. बन्ने यांचा मोहनलाल दोशी विद्यालयात सत्कार

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात २४ वर्षे सेवा बजावणारे शिक्षक रामचंद्र बन्ने यांचा सेवनिवृत्तीनिमित्त सपत्नीक प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे संचालक प्रदीप मोकाशी यांच्या हस्ते रोपटे व सन्मानपत्र देऊन बन्ने दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी शिक्षक प्रतिनिधी आर.आर. कपले यांनी स्वागत केले. मुख्याध्यापिका एस. …

Read More »

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सन्मती विद्यामंदिरचे यश

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मती विद्यामंदिर मधील सोहम साळवे व प्रतिक नेजे या विद्यार्थ्यांनी तालुका पातळी विज्ञान प्रदर्शनामध्ये मांडलेल्या ‘गॅस‌ लिकेज डिटेक्टर’ या माॅडेलने तृतीय क्रमांक पटकावला. गॅस गळती स्वयंचलीत पध्दतीने शोधून काढून त्याची माहिती देणारे मशीन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केलेला होता. सध्याच्या …

Read More »