निपाणी (वार्ता) : येथील विनायक शेटके यांच्या मातोश्रीवर कोल्हापूर येथील अस्टर आधार या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी ५ लाख रुपये इतका होता. यावेळी आर्थिक मदतीसाठी विनायक शेटके यांनी श्रीराम सेना हिंदुस्थानचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष निलेश हत्ती यांची भेट घेतली. त्यानुसार संबंधित कुटुंबीयांना महाराष्ट्र येथील मुख्यमंत्री …
Read More »महात्मा गांधी रुग्णालयामधील डायलिसिस मशीन धूळखात!
निपाणी : येथील महात्मा गांधी रुग्णालयामध्ये किडणी आजार रुग्णांच्या सोयीसाठी डायलिसिसची नवीन ६ मशीन आलेली आहेत. अनेक महिने जोडणीच्या नावाखाली मशीन तशीच पडून आहेत. त्यामुळे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती डायलिसिस रुग्णांची झाली आहे. तरी आरोग्य विभागाने त्याकडे लक्ष देऊन तत्काळ मशीन जोडण्याची मागणी डायलिसिस रुग्णांतून होत आहे. …
Read More »राष्ट्रचिन्हाचा अवमान करणाऱ्या कृत्यावर कठोर कारवाई करा
विविध हिंदुत्ववादी संघटनांची मागणी; तहसीलदारांमार्फत वरिष्ठांना निवेदन निपाणी(वार्ता) : जम्मू आणि काश्मीर राज्यातील हजरतबल दर्यातील मुख्य प्रार्थनागृहाबाहेर असणाऱ्या फलकावरील भारताचे राष्ट्रचिन्ह ‘अशोक स्तंभ’ काही धर्मांध आणि देशविघातक घटकांनी तोडून टाकले आहे. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या गैरकृत्यामुळे भारतीय अस्मिता, संविधान आणि सार्वभौमत्वावर केलेला थेट हल्ला आहे. …
Read More »जैन बोर्डिंगच्या श्रीनिकेतन शाळेतर्फे सहकाररत्न डॉ. कुरबेट्टी यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन मराठी माध्यम शाळा व शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूलचे संस्थापक डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी यांना सहकार रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्त शांतिनिकेतन हायस्कूलचे अध्यक्ष कपूरचंद इंगळे, डॉ. अनिल ससे, संचालक मिलिंद चौगुले, सेक्रेटरी प्रदीप पाटील आणि शिक्षकातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. …
Read More »शासनाच्या सोयी, सुविधा मिळविण्यासाठी धार पवार बांधवांचा लवकरात निपाणीत मेळावा
निपाणी (वार्ता) : धार, पवार बांधवांना एकत्र आणण्यासाठी निपाणी लवकरच बेळगाव जिल्ह्यासह सीमाभागातील धार पवार समाजबांधवांची व्यापक मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे समाज बांधवांनी संपर्क साधण्याचे आवाहन समाजाचे ज्येष्ठ नागरिक गोविंद पवार निपाणी (रामपूरकर) यांनी केले आहे. पवार म्हणाले, समाजाचा इतिहास सीमा भागातील पवार बांधवांना समजणे आवश्यक आहे. याशिवाय …
Read More »सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक एम. डी. मुल्ला यांचा विविध ठिकाणी सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील सरकारी कन्नड उच्च प्राथमिक शाळा क्र.१ चे मुख्याध्यापक एम. डी. मुल्ला हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध शाळा, संघटना व समित्यांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. एसडीएमसी समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सत्याप्पा चिंगळे होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन झाले. …
Read More »विज्ञान स्पर्धामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक
कुर्ली हायस्कूलमध्ये विज्ञान वाचन गोष्टी स्पर्धा निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्ती जोपासण्यासाठी व त्यांच्यातील कल्पकतेला वाव देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आवश्यक आहेत. विज्ञान स्पर्धा व कृतियुक्त शिक्षणामुळे विज्ञानाबद्दल गोडी निर्माण होवून कल्पकतेला चालना मिळते, असे मत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात …
Read More »गाळेधारकांच्या नोटीसा मागे न घेतल्यास आंदोलन; नगरपालिका गाळेधारकांचा इशारा
नगरपालिकेच्या नोटीसीमुळे गाळेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेतर्फे शहरातील गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त आदेशानुसार गाळे रिकामी करून नगरपालिकेच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यानंतर या गाळ्यांचा फेरलिलाव केला जाणार असल्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.गाळेधारकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त …
Read More »वाळकीतील शर्यतीत पाचगावची बैलगाडी प्रथम
महादेव यात्रेनिमित्त भव्य आयोजन निपाणी (वार्ता) : वाळकी येथील ग्रामदैवत महादेव यात्रेनिमित्त मंगळवारी (ता.९) सकाळी पार पडलेल्या भव्य बैलगाडी, घोडागाडी व घोडेस्वार शर्यतीत पाचगाव येथील सागर पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात आले. जनरल बैलगाडी शर्यतीत सागर पाटील-पाचगाव यांनी ३० हजार रुपये …
Read More »दत्त खुले नाट्यगृहसमोरील तलावातील पाण्यामुळे होणाऱ्या समस्याबाबत आयुक्तांना निवेदन
निपाणी (वार्ता) : नगरपालिका मालकीच्या दत्त खुले नाट्यगृहासमोरील तलावातील दूषित पाण्यामुळे परिसरात आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी वारंवार केली असली तरी नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. याबाबत शासननियुक्त नगरसेवक अरुण आवळेकर यांच्या हस्ते मंगळवारी (ता.९) नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta