Sunday , July 26 2026
Breaking News

दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल स्नेहा उत्तुरे यांचा ‘अरिहंत’तर्फे सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : जिद्द आणि मेहनतीने यश मिळवून दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल भोज येथील श्रेया सुनील उत्तुरे यांचा बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील, कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, मिनाक्षीआई पाटील, धनश्री पाटील व विनय श्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उत्तम पाटील यांनी, स्नेहा उत्तुरे यांनी, अथक परिश्रम, जिद्द, सातत्य आणि शिक्षणावरील निष्ठेमुळे मिळवलेले हे यश संपूर्ण गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. योग्य ध्येय, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविल्याचे सांगितले.
यावेळी अरिहंत परिवारातील विविध संघ संस्थांचे पदाधिकारी नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *