Monday , September 21 2026
Breaking News

बेनाडीतील झेंडूची फुले निघाली गोव्याला

Spread the love

 

चार एकरात घेतली झेंडूची बाग : संदीप तावदारे यांनी फुलवली फुलशेती

निपाणी (वार्ता) : निसर्गाचा लहरीपणा, शेती पिकवण्यासाठी येणारा खर्च, शेतीमालाला मिळणारा दर अशा विविध कोंडीत शेतकरी वर्ग सापडला आहे. त्यावर मात करून बेनाडी येथील युवा शेतकरी संदीप तावदारे यांनी पारंपारिक शेतीला फाटा देऊन चार एकर क्षेत्रात झेंडूची बाग फुलवली आहे. गेल्या महिन्यापासून फुलांची तोड सुरू झाली असून गोवा बाजारपेठेत फुले पाठवली जात आहेत. सध्या ४० ते ६० रुपये किलो प्रमाणे फुलांना भाव मिळत असल्याने उत्पन्न चांगले मिळत आहे.

संदीप तावडे यांनी यांनी सांगाव येथून ३ रुपये रोप प्रमाणे चार एकरात झेंडूची बात केली आहे. लावण करून फुले लागेपर्यंत त्यांना १ लाख ६० हजार रुपयांचा खर्च आला आहे. सध्या झेंडू फुलांची बाग फुलली असून तोडणी सुरू झाली आहे. दररोज एक ते दीड टन फुलांची निर्यात केली जात आहे. जिद्द, कष्ट आणि योग्य नियोजनाच्या जोरावर त्यांनी हा यशस्वी प्रयोग साकारला आहे. दररोज औषध फवारणी व फुले तोडणीसाठी २० मजूर कार्यरत आहेत. ठिबक पद्धतीने बागेला पाणी दिले जात आहे. गोवा बाजारपेठेसह निपाणी परिसरातील काही व्यापारीही दररोज शंभर ते दीडशे किलो फुलांची खरेदी करीत आहेत. शेतातच विक्री केल्यास ५० रुपये प्रति किलो दर मिळत आहे.
—————————————————————-
पिवळी धम्मक फुले
झेंडू फुलांची बाग पिवळ्या धमक रंगामुळे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. फुललेली ही बाग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत असून संदीप तावदारे यांचा हा शेतीत आधुनिक शेती घडविणारा प्रयोग ठरत आहे.
——————————————————————–
‘दरवर्षी पारंपारिक पिके घेत असल्याने जमिनीचा पोत कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फुल, फळ, भाजीपाला शेती केली पाहिजे. त्यासाठी मेहनत करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे.’
-संदीप तावदारे, युवा शेतकरी, बेनाडी

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *