दड्डी : जय भवानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ खवनेवाडी ता – हुक्केरी जि – बेळगांव येथे भव्य 58 किलो वजनी गटात कबड्डी स्पर्धेचे आयोजन खास दीपावली निमित्त शनिवार दि. १८/१०/२०२५ रोजी सायंकाळी ठीक ०५ वाजता आयोजित केली आहे. तरी हौशी महाराष्ट्र – कर्नाटक कबड्डी प्रेमींनी याचा लाभ घ्यावा …
Read More »सरपंच चषक मोदगे येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत
दड्डी : सरपंच चषक फौंडेशन, मोदगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ ते रविवार २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केली आहे. तरी हौशी आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, कर्नाटक बैलगाडा मालकांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती. पुढील प्रमाणे बक्षीसे अशी …
Read More »घटप्रभा हायस्कूल सलामवाडी येथे सेवानिवृत्त सत्कार सोहळा संपन्न
दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा हायस्कूल सलामवाडी शाळेचे मुख्याध्यापक बी व्ही पेडणेकर यांनी 33 वर्ष व क्लार्क अरुण ईरपाणा पाटील हे 31वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या शुभेच्छा समारोप प्रसंगी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव विक्रम पाटील, पी. पी. …
Read More »संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला जनसागर लोटला…
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज जनसागर लोटलेला दिसला. रविवार सुट्टीचा दिवस आणि उद्या सोमवार दि. १५ रोजी निलगार गणपती विसर्जन असल्याने भाविक लाखोंच्या संख्येने उपस्थित दिसले. निलगार गणपती दर्शनासाठी हेद्दुरशेट्टी निवासस्थान ते थेट पोलीस स्थानका पर्यंत भाविकांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या दिसल्या. आज अलोट गर्दीत …
Read More »सलामवाडीत रंगला होम मिनिस्टरचा कार्यक्रम…..
दड्डी (वार्ताहर) : सलामवाडी ता. हुक्केरी येथील ओंकार गणेश उत्सव मंडळातर्फे आयोजित केलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या महिलांसाठी बॉल फेकणे, डोक्यावरून फुगे मारणे, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, उखाणे, आरती तयार करणे इत्यादी स्पर्धात्मक खेळ घेण्यात आले. स्पर्धेत पहिला क्रमांक शुभांगी …
Read More »संकेश्वर निलगार गणपतीचे मुख्य सेवेकरी अशोक हेद्दूरशट्टी यांच्या निधनामुळे गणपतीचे दर्शन दोन दिवस बंद
संकेश्वर : संकेश्वर शहरातील निलगार गणपती उत्सवाशी निगडित दु:खद घटना समोर आली आहे. निलगार गणपतीची परंपरा जपणारे आणि गणपतीचे प्रमुख सेवेकरी असलेले अशोक हेद्दूरशट्टी यांचे आज निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संकेश्वर निलगार गणपती भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. भाविकांच्या भावनांचा विचार करून आज व उद्या (दि. ३१ ऑगस्ट व …
Read More »लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे योगा आणि बुद्धिबळ स्पर्धेत यश
मणगुत्ती : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, लालबहादूर शास्त्री विद्यालय मणगुत्ती, तालुका हुक्केरी येथे झालेल्या तालुकास्तरीय योगा स्पर्धेत लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला या संघाची चिकोडी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघामध्ये पुढील विद्यार्थिनींचा सहभाग आहे. कुमारी सुषमा पाटील, दिया धनाजी, दिव्या पाटील, गौतमी पाटील …
Read More »सलामवाडी सरकारी मराठी शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून फ्रिज भेट!
दड्डी : सलामवाडी ता हुक्केरी येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 1992- 93 बॅचच्या इयत्ता 7वीच्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या भोजन सामग्रीची अडचण ओळखून दूर करण्यासाठी पुढाकार घेऊन सरकारी मराठी मुलांची शाळा सलामवाडी या शाळेला फ्रीज सप्रेम भेट देण्यात आली. तसेंच गावातील घटप्रभा हायस्कूल सलामवाडी येते वीस लिटरचे कुकर दिले …
Read More »ग्रामपंचायत सदस्याचा अनैतिक संबंधातून निर्घृण खून; शरीराचे तुकडे हिरण्यकेशी नदीत फेकले!
कोल्हापूर : कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून करून मृतदेह संकेश्वरजवळ हिरण्यकेशी नदीत फेकून देण्यात आले. लखन बेनाडे असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. मागील आठ दिवसांपासून बेनाडे हे बेपत्ता होते, बेनाडे यांच्या शरीराचे दोन तुकडे करून मृतदेह कर्नाटकमधील हिरण्यकेशी नदीत …
Read More »लग्न न झाल्याच्या निराशेमुळे दोन भावांनी केली आत्महत्या!
संकेश्वर : जीवनाला कंटाळून दोन भावांनी आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील कोननकेरी गावात ही दुर्घटना घडली. लग्न न झाल्याच्या निराशेमुळे दोन्ही भावांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्यााचे समजतते. संतोष रवींद्र गुंडे (५५) आणि अण्णासाहेब रवींद्र गुंडे (५०) हे मृत भाऊ आहेत. लग्न न झाल्याने दोन्ही भावांना दारूचे व्यसन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta