Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटक

भाजप काळातील घोटाळ्यांच्या चौकशीला गती देणार

  जी. परमेश्वर; आठवडाभरात मंत्री समितीची बैठक बंगळूर : मागील भाजप सरकारच्या काळात झालेल्या विविध घोटाळ्यांबाबत सरकार आणि तपास यंत्रणांच्या चौकशीच्या संदर्भात करावयाच्या कारवाईचा आढावा आणि समन्वय साधण्यासाठी मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची बैठक आठवड्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बुधवारी दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

मुडा प्रकरण : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या याचिकेवर आज पुढील सुनावणी

  अंतिम निकालाचीही शक्यता बंगळूर : राज्याच्या राजकारणात उत्सुकता निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधातील खटल्याबाबत आज (ता. १२) उच्च न्यायालयात अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. उद्या ते शक्य नसल्यास, उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती नागप्रसन्ना अंतिम निकाल देऊ शकतात किंवा युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर निकाल राखून ठेवू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचे …

Read More »

…चक्क कन्नडमध्ये औषधांचे प्रिस्क्रिप्शन!

  बंगळुरू : एखाद्या भाषेच्या अस्तित्वाला किंवा नष्ट होण्यास आपणच जबाबदार आहोत. एखाद्या भाषेचे कौतुक, आदर, वापर यामुळे ती भाषा टिकते. अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे भाषेबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. त्याचप्रमाणे येथील एका डॉक्टरने आपल्या मातृभाषेवर, कन्नडच्या प्रेमापोटी आता आपल्या कन्नडमध्ये औषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात केली आहे. याद्वारे कन्नड प्रेम वेगवेगळ्या प्रकारे …

Read More »

लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!

खानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून लक्ष्मी देवीच्या सोन्याच्या 16 पुतळ्या, तसेच 40 ते 50 तोळा चांदीचे दागिने, कमरपट्टा व इतर, सोन्या चांदीचा किमती ऐवज चोरीला गेला आहे. त्याची किंमत अडीच लाखापर्यंत आहे. आज सकाळी पुजाऱ्याच्या व ग्रामस्थांच्या लक्षात आली. खानापूर पोलीस स्थानकाला …

Read More »

लिंगायत आरक्षणासाठी २२ रोजी अधिवेशन

  बसव मृत्युंजय स्वामी; वकील संघटना करणार नेतृत्व निपाणी (वार्ता) : लिंगायत समाजाला २/अ मध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून आरक्षण मिळावे, यासाठी पाच वर्षापासून लढा सुरू आहे. तरीही शासनाने कोणतीच भूमिका घेतलेली नाही. परिणामी राज्यातील लिंगायत समाजातील वकील संघटनेच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे निश्चित केले आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी …

Read More »

समाज एकसंघ ठेवण्यासाठी सण उत्सवांची रचना

  कमल चौगुले‌; कुर्लीत झिम्मा, फुगडी स्पर्धा निपाणी (वार्ता) : आजच्या धावत्या युगात भारतीय संस्कृतीचा वारसा सणाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे शक्य आहे.भारतीय सण उत्सवांची रचना ही सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी केली आहे, असे मत निलगंगा महिला मंच अध्यक्षा कमल चौगुले यांनी व्यक्त केले. त्या कुर्ली येथील एच जे सी …

Read More »

कर्नाटकचे आरोग्यमंत्री सन्माननीय दिनेश गुंडूराव जिजाऊ मंडळाच्या गणरायाच्या चरणी…

  खानापूर : आज कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव, शिवस्मारक चौकातील जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या दर्शनास पोचले.. डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आरोग्यमंत्र्यांना आमच्या गणपती मंडळास भेट देण्याची विनंती केली असता मा. मंत्री महोदयांनी लगेच होकार दर्शविला. आरोग्य मंत्र्याच्या हस्ते गणरायाची आजची आरती संपन्न झाली. जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सन्माननीय दिनेश गुंडूराव …

Read More »

६० वर्षीय महिलेचाही माजी खासदार प्रज्वल रेवण्णाकडून लैंगिक अत्याचार; आरोपपत्रात नमूद

  बंगळुरू : माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी ६० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे एसआयटीने दाखल केलेल्या दुसऱ्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. एसआयटीने माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे, जो अश्लील व्हिडिओ आणि बलात्कार प्रकरणात परप्पन अग्रहार कारागृहात कैद आहे. आरोपपत्रातील काही माहिती उपलब्ध झाली …

Read More »

60 खाटांच्या माता व बाल रुग्णालयाचे उद्घाटन व 100 खाटांच्या रुग्णालय इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम उद्या

  खानापूर : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव तसेच जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खानापुर शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत बांधण्यात आलेल्या 60 खाटांचा माता व बाल रुग्णालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ आणि नाबार्ड RIDF-30 योजनेंतर्गत 100 खाटांच्या तालुका रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा पायाभरणी समारंभ उद्या …

Read More »

गौरी निर्माल्य संकलनाची ८ वर्षे

  दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनाचा उपक्रम निपाणी (वार्ता) : पर्यावरण संवर्धन करण्याच्या समाजिक भावनेतून येथील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, हेल्थ क्लब आणि जायंट क्लबच्या माध्यमातून फाउंडेशनचे संस्थापक आणि टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष सयोजीत उर्फ निकु पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वमालिकेच्या खनीमध्ये गणेश विसर्जन करण्यासह निर्माल्य संकलनाचा उपक्रम सलग ८ वर्षे …

Read More »