Sunday , January 18 2026
Breaking News

मुडा प्रकरण : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या याचिकेवर आज पुढील सुनावणी

Spread the love

 

अंतिम निकालाचीही शक्यता

बंगळूर : राज्याच्या राजकारणात उत्सुकता निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधातील खटल्याबाबत आज (ता. १२) उच्च न्यायालयात अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. उद्या ते शक्य नसल्यास, उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती नागप्रसन्ना अंतिम निकाल देऊ शकतात किंवा युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर निकाल राखून ठेवू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वतीने आज दुपारी १२ वाजता युक्तिवाद करणार आहेत. त्यांचा युक्तिवाद संपल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता राज्यपालांच्या विशेष सचिवांच्या वतीने अंतिम युक्तिवाद सादर करतील.
त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजकीय भवितव्यावर आज हायकोर्टात चर्चा होणार आहे. गेल्या वेळी अर्जाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांनी याचिकाकर्त्याला अर्जाची सुनावणी गुरुवारी पूर्ण करावी, असे तोंडी निर्देश दिले होते.
सरकारतर्फे लक्ष्मी अय्यंगार, राघवन, रंगनाथ, ॲडव्होकेट जनरल शशीकुमार शेट्टी आणि रविवर्मा कुमार यांच्यासह मान्यवरांनी तक्रारदाराच्या वतीने युक्तिवाद केला.
मुडा प्रकरणातील तक्रारदार स्नेहमाई कृष्णा, टी. जे. अब्राहम यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून राज्यपालांनी सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी दिली होती. सिद्धरामय्या यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान दिले होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचे खाजगी फोटो व्हायरल

Spread the love  बेंगळुरू : एका प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आणि बिग बॉस कन्नडच्या माजी स्पर्धकाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *