खानापूर (सुहास पाटील) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर मोठ मोठे खड्डे पडल्याची बातमी “वार्ता”मधुन प्रसिध्द होताच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील खड्डा बुजविला. मात्र इतर खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे इतर लहान खड्डे आता मोठे होणार आहेत. आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण …
Read More »खानापूर तालुक्यात वनप्राण्याकडून पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांना वालीच नाही.
खानापूर (सुहास पाटील) : खानापूर तालुका म्हणजे अतिघनदाट जंगलाने व्यापलेला तालुका त्यामुळे वनप्राण्याकडून नेहमीच शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. जंगल भागाबरोबर तालुक्यातील मलप्रभा नदीकाठी असलेल्या यडोगा, कुप्पटगिरी, बल्लोगा आदी भागातील उस पिकाचे ही जंगली डुक्कर, गवीरेडे आदी जंगली प्राण्याकडून प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे …
Read More »खानापूर तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्यावतीने ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार
खानापूर : खानापूर तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा १२ वा वर्धापन दिन सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी श्री ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात सकाळी ११ वाजता संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. डी. एम. भोसले गुरूजी होते. प्रमुख अतिथी म्हणून खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री …
Read More »मोबाईल चार्जिंग सॉकेटचा करंट लागून एका आठ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
कारवार : बुधवारी कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. मोबाईल चार्जिंग सॉकेटचा करंट लागून एका आठ महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या कारवार तालुक्यातील सिद्धर येथील ही घटना आहे. या अपघाताने परिसरातील नागरिक हादरले आहेत. खेळता-खेळता चार्जरची पिन तोंडात घातली झाले असे की, सिद्धर येथील संतोष …
Read More »माजी आमदार अरविंद पाटील नंदगड सोसायटीत सत्तेत आल्यावर भ्रष्टाचार : महादेव कोळी
खानापूर : खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या नंदगड मुख्य कार्यालयाचा खत विक्रीचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आल्याची माहिती ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी यांनी आज खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना कोळी म्हणाले की, खानापूर तालुक्यातील नंदगड तालुका मार्केटिंग सोसायटीत खत विक्रीत होत असलेल्या गैरप्रकाराबाबत आमच्या नेत्या …
Read More »‘मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांनी केले सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक
नाथाजीराव हलगेकर स्मृतिदिनानिमित्त उपक्रम निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील शैक्षणिक क्रांतीचेआद्य हितचिंतक, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते व शिक्षण महर्षी नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून निपाणी नगरी स्वच्छ आणि सुंदर करणाऱ्या कामगार बंधू आणि भगिनींचे कौतुक करून आभार मानले. दरवर्षी नाथाजीराव हलगेकर …
Read More »खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅस वरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचे साम्राज्य
खानापूर : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅस वरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याकडे कुणा अधिकार्याचे लक्ष नाही की, लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात खड्डे पडल्याने बस वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. खड्ड्यामुळे बसमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. दिवसेंदिवस बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील खड्डे वाढत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून …
Read More »मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये तीन दिवशीय भारत स्काऊट आणि गाईडचे शिबिर
निपाणी (वार्ता) : स्काउट्स आणि गाईड्सचे ध्येय तरुणांना त्यांच्या पूर्ण शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षमतेपर्यंत पोहोच विण्यास मदत करणे हे,आहे. जेणेकरून ते जबाबदार नागरिक बनू शकतील. जे स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बदल घडवू शकतील हे अनुभवात्मक शिक्षणास समर्थन देते. प्रौढांच्या देखरेखीखाली लहान गटांमध्ये सहभाग. विविध प्रगतीशील …
Read More »प्रा. डॉ. रमेश साळुंखे यांच्या राजकीय नाटक आणि गो. पु. देशपांडे या संशोधन ग्रंथाला ‘प्रा. प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार’
निपाणी (वार्ता) : प्रा.प्रल्हाद लुलेकर प्रतिष्ठान,औरंगाबाद’च्या वतीने मागील दोन वर्षापासून मराठी साहित्यातील समीक्षा, संशोधन आणि वैचारिक लेखनासाठी ‘प्रा.प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. २०२३ चा पुरस्कार प्रा. डॅा. रमेश साळुंखे यांच्या ‘राजकीय नाटक आणि गो.पु. देशपांडे’ या ग्रंथाला घोषित करण्यात …
Read More »लाल बहादूर शास्त्री विद्यालयास पुस्तके प्रदान…
बेळगाव : कोल्हापूर येथील नामांकित अशा वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नुकताच विविध पुरस्कारांचे वितरण झाले. या पुरस्कारांचे वितरण युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाले. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र व कर्नाटक सिमाभागातून दर्जेदार अशी शेकडो पुस्तके प्राप्त झाली होती. या पुस्तकातील रुपये 7000/- किंमतीची पुस्तके मणगुत्ती (ता. हुक्केरी, बेळगाव) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta