Sunday , July 26 2026
Breaking News

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे निपाणीतील कार्यकर्त्यातर्फे जंगी स्वागत

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी एकसंबा येथे जाणार होते. तत्पूर्वी त्यांनी कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन निपाणीमार्गे जाताना पहिल्यांदाच निपाणीला भेट दिली. यावेळी ‌येथील कार्यकर्त्यांनी बसस्थानकाजवळील धर्मवीर संभाजीराजे चौकात फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देऊन उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा सत्कार करण्यात आला.
डी. के शिवकुमार हे दुपारी एक वाजता निपाणीत येणार असल्याची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकामध्ये मोठी गर्दी केली होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास धर्मवीर संभाजीराजे चौक आल्यानंतर काँग्रेस नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, प्रतिमा, आणि फेटा देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष आयोजित उर्फ निकु पाटील यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा छत्रपती शिवाजी महारारांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर चौकातील धर्मवीर संभाजी राजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, राजेश कदम, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, अल्लाबक्ष बागवान, किरण कोकरे, झाकीर कादरी, विश्वास पाटील, अस्लम शिकलगार, रामा निकम, दीपक ढनाल, ॲड. संजय चव्हाण, अब्बास फरास, अरुण आवळेकर, अशोक लाखे, विनोद साळुंखे, सागर पाटील, सुनील गाडीवड्डर, इंद्रजीत बगाडे, मुकुंद रावन, किरण पाटोळे, शशिकांत चडचाळे, प्रकाश पोटजाळे, वर्षा चव्हाण यांच्यासह नगरपालिकेचे आजी माजी पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *