Monday , September 21 2026
Breaking News

बोरगाव के. एस. पाटील हायस्कूलमध्ये दहावी विद्याथ्यर्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बोरगाव शिक्षण संघाच्या के. एस. पाटील माध्यमिक शाळेत दहावी विद्याथ्यर्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी शिक्षण संधाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून निपाणी येथील व्हीएसएम कॉलेजचे सीईओ डॉ. एस. बी. पाटील होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन झाले.
सन २०२५ २६ सालातील आदर्श विद्यार्थी, विद्यार्थिनी, चित्रकार, जनरल चॅम्पियन विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
डॉ. एस. बी. पाटील यांनी, परीक्षेत मिळवलेल्या टक्केवारी पेक्षा संस्कार आहेत. आपल्या अंगी असलेली कौशल्ये आत्मसात केल्यास जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आई-वडील, गुरु, शेतकरी व सैनिकांचा आदर करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास संचालक शांतिनाथ लगारे, महावीर रोड्ड, महादेव नेजे, मुख्याध्यापक ए. ए. धुळासावंत, आदिनाथ हवले, के. बी. पाटील, उल्हास मैशाळे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *