Monday , September 21 2026
Breaking News

बोरगाव अरिहंत क्रेडिट संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत को-ऑप. क्रेडिट (मल्टीस्टेट) संस्थेच्या कारदगा शाखेतर्फे येथील अरिहंत सभागृह गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरण करून सन्मानित करण्यात आले. अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटी आणि सहकारत्न उत्तमआण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षण क्षेत्राला बळ देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास संचालक मल्लापा भागाजे- हुद्दार, सुरेंद्र आळते, अब्दुल शिराजभाई, महादेव डांगे, सम्राट पसारे, शाखा अधिकारी समीर नदाफ यांच्यासह संचालक सभासद, कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *