Monday , April 20 2026
Breaking News

आला उन्हाळा, वाहनांना सांभाळा!

Spread the love

 

वाढत्या तापमानामुळे आग; स्वतःसह वाहनांची घ्या काळजी

निपाणी (वार्ता) : यंदा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच निपाणी आणि परिसरात तीव्र उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. पारा ३१ अंशावर पोहोचला आहे. दरवर्षी मार्च, एप्रिल व मे महिन्यात अशा वाढत्या उष्यामुळे आग लागण्याच्या घटनांत वाढ होत आहे. दोनच दिवसापूर्वी येथील अक्कोळ रोडवर धावत्या मारुती व्हॅन ने पेट घेतला. तेव्हा दैव बोलत तर म्हणून प्राणहानी झाली नाही. मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. अशा घटनांमुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय अग्निशमन यंत्रणेवरही ताण पडत आहे. आग लागण्यामागे शॉर्ट सर्किट हे प्रमुख कारण असले तरी उन्हाळ्यामध्ये आगीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास गंभीर घटना टाळता येणे शक्य असल्याचे येथील मेकॅनिक संतोष पोवार (मिस्त्री) यांनी सांगितले.
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालल्याने वाहनांच्या पेट्रोल, गॅस टाकी व बॅटऱ्या अधिक गरम होऊन स्फोट होण्याचा धोका असतो. वाहनामधील सॅनिटायझर, परफ्युममधील गॅस ज्वलनशिल असल्यामुळे ते गरम होऊन त्याचा स्फोट होऊ शकतो. गाडीत डॅशबोर्डवर ठेवलेल्या पाणी बॉटलमधुन तीव्र उन्हाची किरणे परावर्तीत होऊन गाडीला आगीचा धोका होऊ शकतो.
राष्ट्रीय महामार्गासह बहुतांश भागात तापमानात वाढ होत असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वाढत्या उष्यामुळे गाड्यांच्या पेट्रोल व गॅसची टाकी क्षमतेपेक्षा जास्त गरम होऊन गाडयांचा स्फोट होण्याच्या वाढत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
——————————————————————–
‘उन्हामुळे आगीच्या घटनांत वाढ होते. यामध्ये शॉर्ट सर्किट हे प्रमुख कारण आहे. वाहने अधिक काळ उन्हामध्ये लावू नयेत. पेट्रोल टाकी, गॅस व बॅटरी गरम होऊन स्फोट होण्याचा धोका असतो. वाहनधारकांनी योग्य काळजी घेतल्यास वाहनांच्या आगीच्या घटना टाळता येऊ शकतात.’
-एस.एन. नांगनुरे, निरीक्षक अग्निशामक दल, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *