रामनगर – येथे झालेल्या केएसआरटीसी बस आणि मोटारच्या सतनूरजवळील दुर्घटना बंगळूर : रामनगर जिल्ह्यातील सतनूरजवळ केएसआरटीसी बस आणि मोटारची समोरासमोर धडक झाली आणि या भीषण अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. केएसआरटीसी बस आणि क्वालीस मोटारमध्ये दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. क्वालिसमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. …
Read More »निपाणीत सेंट्रींग कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
निपाणी (वार्ता) : येथील सेंट्रींग कामगाराने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आली. स्वप्निल मनोहर सुतार (वय ३३ रा. जत्राटवेस मातंग समाज वसाहत, निपाणी) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की स्वप्निल हा गेल्या अनेक वर्षापासून सेंट्रींग कामगार म्हणून काम …
Read More »भ्याड हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा
राजू पोवार; मंगळवारचा मोर्चा होणारच निपाणी (वार्ता) : रयत संघटनेच्या माध्यमातून हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्यासाठी मंगळवारी (ता.२९) आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असताना रयत संघटनेचे बेळगाव जिल्ह्याचे नेते वकील यल्लाप्पा हेगडे यांच्यावर मुर्गेश निराणी आणि त्यांच्या बंधूनी गुंडाच्या माध्यमातून जीवघेणा …
Read More »खानापूर नगरपंचायतीचे विद्यानगरातील रस्ते, गटारींकडे साफ दुर्लक्ष, रहिवाशातून नाराजी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ते, गटारी, कामाकडे खानापूर नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. याबाबतीत संबंधित नगरसेवक, चीफ ऑफिसर उदासीन आहेत. यंदाच्या पावसाळ्यात गटारी नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. पावसाळ्यात रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळे निसरड झाली होती. या चिखलामुळे …
Read More »प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे : प्रा. संध्या देशपांडे
खानापूर : आयुष्य हे क्षणभंगुर आहे. आपल्याला मनुष्य म्हणून जन्म मिळाला आहे. त्यासाठी जास्तीत जास्त उत्तम माणूस म्हणून जगण्यासाठी चांगले कार्य हाती घ्या. अलिकडच्या विज्ञान युगात मोबाईल सारख्या साधनाचा अतिरेक वाढला आहे. त्याचा परिणाम आजच्या विद्यार्थी वर्गाच्या जीवनावर होत आहे. विद्यार्थी वर्गाने मोबाईलच्या आहारी न जाता वेळेचे भान ठेवून …
Read More »‘नेमबाजी’साठी नाईंग्लजच्या उचगावेची निवड
ब्राझिलमध्ये सप्टेंबरमध्ये रंगणार विश्व नेमबाज स्पर्धा : बेळगाव जिल्ह्यातून एकमेव निवड निपाणी (वार्ता) : मनात जिद्द आणि आत्मविश्वास आणि सहकार्य करणारे हात सोबत असतील तर त्याच्या जोरावर आपले ध्येय गाठू शकतो. कितीही जबाबदारी आणि काम असले तर त्यातूनही वेळ काढून आपले ध्येय गाठण्यासाठी माणूस प्रयत्न करीत असतो. याचेच उत्तम …
Read More »गणरायाला सजविण्यासाठी लगबग
निपाणी परिसरात मूर्ती कारागिरांची तयारी : उत्सवासाठी अवघा महिना शिल्लक निपाणी (वार्ता) : यंदाच्या गणेशोत्सवाला अवघा एक महिन्याचा कालावधी उरला असून निपाणी आणि परिसरातील कारागिरांनी गणेश मूर्ती बनवण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामध्ये घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या मूर्तींचा समावेश आहे. सध्या गणेश मूर्ती कारागिरांची गणेशमूर्ती सजविण्यासाठी लगबग सुरू आहे. …
Read More »कुरली नदी घाटावर चिखलाचे साम्राज्य
साफ करण्याची मागणी : नागरिकांना त्रास कोगनोळी : कुरली तालुका निपाणी येथील वेदगंगा नदी घाटावर चिखलाचे साम्राज्य झाले असल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने ताबडतोब चिखल व इतर घाणीची स्वच्छता करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी होत आहे. कुरली येथील वेदगंगा नदीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घाट बांधण्यात …
Read More »सीपीआय बी. एस. तळवार यांचा सत्कार
कोगनोळी : निपाणी मंडल पोलीस निरीक्षक पदी बी. एस. तळवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार केला. ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब कागले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी कोरोना काळात अत्यंत चांगले …
Read More »कोगनोळीत तुंबलेल्या गटारीची स्वखर्चाने केली स्वच्छता; ग्रामपंचायतीचे अक्षम दुर्लक्ष
कोगनोळी : येथील मुख्य रस्त्यावरील अंबिका पतसंस्थेसमोर गेल्या कित्येक महिन्यापासून गटार तुंबली होती. त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरुन वाहत होते. तसेच गटारीवर गवत व झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. तसेच गटारी तुंबल्याने डासांचा उपद्रवही मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुख्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta