खानापूर (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच प्राथमिक शाळा शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पार पडली. याचा सर्वात जास्त फटका खानापूर तालुक्यातील शाळांना होणार आहे. कारण खानापूर तालुका हा अतिदुर्गम व जंगलाने व्यापलेला आहे. अशा तालुक्यातील गावांना वाहतुकीची सोय नाही. तसेच जंगल भागातील गावांना सुविधा नाहीत. अशा दुर्गम भागातील शाळांना जाणाऱ्या …
Read More »लोंढा विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धा संपन्न
खानापूर : गुंजी (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर लोंढा विभागीय माध्यमिक विद्यालय क्रीडा स्पर्धा मंगळवारी दि ८ रोजी संपन्न झाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजी हायस्कूलचे एसडीएमसी अध्यक्ष मारूती जाधव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष गुरव, उपाध्यक्ष अमोल बेळगावकर, पीकेपीएस सोसायटीचे संचालक हरिहर …
Read More »मंगसुळीत राष्ट्रीयीकृत बँकेची मागणी
कागवाड : मंगसुळी येथे कर्नाटक विकास ग्रामीण बँक ही एकमेव बँक असून येथील सर्व आर्थिक व्यवहार याच बँकेमध्ये चालतात. सदर बँकही अपुल्या जागेत असून बँकेत कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहाराला अडचण होत आहे. यासाठी प्रत्येक विभागाचे वेगवेगळे काऊंटर करून कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत …
Read More »गुंजी गावातील डुकरांचा बंदोबस्त करावा; ग्रामस्थांचे निवेदन
खानापूर : गुंजी गावामध्ये छावणीतील पाळीव डुक्कर सोडलेली असल्यामुळे गावात डुकरांचा उपद्वाप वाढलेला आहे. याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. परिसरातील शेत पिकांचे देखील नुकसान होत आहे. त्यासाठी डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे निवेदन गुंजी ग्रामस्थांनी पीडीओ आणि ग्रामपंचायत अध्यक्षांना दिले आहे. पाळीव डुकरे गावामध्ये व परिसरातील शेतांमध्ये घुसून …
Read More »वरकड गावाजवळील पूल पावसामुळे कोसळला!
खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा गावापासून बारा किलोमीटरवर असलेल्या वरकड गावाजवळील पूल नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. त्यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे. पूल कोसळल्यामुळे बस बंद झाली आहे, त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. मागील वर्षी तात्पुरती डागडुजी झाली होती …
Read More »शेतजमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून निवेदन सादर खानापूर : बेळगाव- पणजी राष्ट्रीय महामार्गावरील शेतजमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत तालुक्यातील रस्ते मंजूर करण्याबाबत खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट …
Read More »तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील तारेचे कुंपण रहदारीला अडचण
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात नेहमीच रहदारीची समस्या चर्चेत असते. अशीच चर्चा खानापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर रहदारीची समस्या होत असल्याची चर्चा सर्व थरातुन होत आहे. खानापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील असलेल्या जागेवर चहाच्या टपरी चालु होत्या. त्या बंद करून त्या जागेवर तहसील कार्यालयाकडून तारेचे कुंपण घातले असल्याने तहसील कार्यालयात …
Read More »खानापूर तालुका समिती शिष्टमंडळाच्यावतीने महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन सादर
खानापूर : राज्यात अंगणवाडी सेविकांची नेमणूक करण्यात येत आहे. यात अंगणवाडी सेविका उमेदवारास प्रथम भाषा कन्नडची अट घातली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक गावात कन्नड भाषिक अंगणवाडी सेविकांची नेमणूक होणार आहे. त्यामुळे मराठी मातृभाषेच्या उमेदवारांवर अन्याय होऊन अंगणवाडीतील लहान बालकांना कानडी शिक्षण घेण्याची वेळ येणार आहे. यासाठी खानापूर …
Read More »उडुपी महाविद्यालयातील व्हिडीओ चित्रीकरण प्रकरणाची सीआयडी चौकशी करणार
बंगळुरू : उडुपी येथील एका खाजगी महाविद्यालयाच्या शौचालयामधील व्हिडिओ चित्रीकरणाचे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले की, हे प्रकरण संवेदनशील असल्याने पुढील तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्यात आले आहे. उडुपी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महिला बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले …
Read More »ऊसावर ‘लोकरी’चा प्रादुर्भाव
टंचाईसह ऊसावर कीड ; दुहेरी संकटामुळे शेतकरी हवालदिल निपाणी (वार्ता) : तालुक्यात ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर लोकरीमावा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकीकडे, पावसाअभावी ऊसाचे पीक वाळून गेले असताना आता लोकरी माव्याचे संकट आल्याचे ऊस उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत. गेल्या आठवड्यात तालुक्यात ढगाळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta