Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

खानापूर शिवस्मारकात शिवाजी महाराजांचा उद्या राज्यभिषेक सोहळा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील पणजी बेळगाव महामार्गावरील शिवस्मारक चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उद्या मंगळवार दि. 6 रोजी साजरा करण्यात येणार आहे. खानापूर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान याच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही तिथी प्रमाणे होत आहे. यंदाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० राज्याभिषेक सोहळा मंगळवारी दि. 6 रोजी होत …

Read More »

‘नो कॅरी बॅग, ओन्ली कागदी बॅग!

  अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे जनजागृती : विद्यार्थ्यांनी काढली गावभर रॅली निपाणी (वार्ता) : शासनाने बंदी करूनही नागरिक अजूनही एकल वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि कॅरीबॅगचा वापर सर्रासपणे करीत आहेत. त्याचा पर्यावरणावर मोठा आघात होत असून ही बाब गांभीर्याने घेऊन येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिक्षकासह विद्यार्थ्यांनी जागतिक …

Read More »

मंत्री सतीश जारकीहोळी यांचा निपाणीत उद्या काँग्रेसतर्फे सत्कार

  निपाणी(वार्ता) : कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व आमचे नेते सतीश जारकीहोळी हे मंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच निपाणी येथे मंगळवारी (ता.६) भेट देणार आहेत. दुपारी तीन वाजता येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनामध्ये निपाणी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार काकासाहेब …

Read More »

महाराष्ट्र शासनाने शिवप्रेमी ओंकार भिसेला आर्थिक मदत करावी

  रायगड (नरेश पाटील) : मूळचा संकेश्वर येथे राहणारा शिवप्रेमी तरुण युवक ओंकार भिसे रायगड किल्ले येथे शुक्रवार दि. ०२ रोजी गड किल्ला चढताना त्याचा वाटेतच मृत्यु झाला. सदर युवक हा महाराष्ट्र सरकार आयोजीत शिवराज्यभिषेक सोहळा कार्यक्रमाकरीता आला होता. मात्र त्याचा मृत्यू झाला. तर सदर युवकाला महाराष्ट्र शासनातर्फे आर्थिक मदत …

Read More »

यरनाळच्या निवृत्त जवानाने दाखविली पाण्यासाठी माणुसकी!

  कुपनलिकेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा : दिवसभरात सहा तास पाणी निपाणी (वार्ता) : यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढल्याने गेल्या दोन महिन्यापासून नदी तलाव विहिरी आणि कुपनलिकेच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे निपाणी भागातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना शेतीवाडीत धावा धाव करावी लागत …

Read More »

१९ रोजी खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे आरक्षण

  खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपुष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण येत्या १९ जुन रोजी जाहीर होणार आहे. येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी सोमवारी दि. १९ रोजी होणाऱ्या …

Read More »

वडाच्या झाडाच्या संवर्धनाचा संकल्प!

  साखरवाडीतील महिला मंडळाचा उपक्रम : वटवृक्ष जतनाचा संदेश निपाणी (वार्ता) : जून महिना आला की वेध लागतात ते मॉन्सूनच्या आगमनाचे त्याचबरोबर हिरवाईने नटणाऱ्या विविध सणांचे. याच कालावधीत निसर्ग संवर्धनाचा संदेश आणि विविध सणांचे आवतन घेऊन येणाऱ्या वटपौर्णिमेला महिलांचे खास आकर्षण असते. ‘जन्मो जन्मी हाच पती मिळू दे’ ही भावना …

Read More »

निपाणीत मान्सूनपूर्व नालेसफाई मोहीमेस प्रारंभ

  स्वतः नगरपालिका आयुक्तांची उपस्थिती; टप्प्याटप्प्याने होणार स्वच्छता निपाणी (वार्ता) : शहरातील मुख्य वस्तीत अस्वच्छतेचा बाजार पाहायला मिळत आहे. तसेच पावसाळा तोंडावर आला असून सुध्दा शहरातील नाले व गटारांची साफसराई करण्याच्या कामाना मुहूर्त मिळालेला नव्हता. अखेर शनिवारपासून (ता.३) नगरपालिकेकडून नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे अभियंते विनायक जाधव,पर्यावरण …

Read More »

सीमाभागाला मिळणार पाणी!

  चिखली धरणातून सोडले पाणी : चार दिवसात पाणी वेदगंगेत निपाणी (वार्ता) : काळमावाडी करार प्रकल्पाचे यंदाच्या हंगामात सीमा भागात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची मुदत संपली होती. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून या भागातील वेद गंगा नदी कोरडी पडली होती. त्यामुळे सीमा भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. ही बाब लक्षात घेऊन कर्नाटकाच्या …

Read More »

बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सतीश जारकीहोळी तर विजयनगरच्या पालकमंत्रीपदी लक्ष्मी हेब्बाळकर यांची नियुक्‍ती

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अखेर अपेक्षेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची नियुक्ती झाली आहे, तर बेळगाव ग्रामीण आमदार आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची विजयनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगलोरहून हा आदेश आज (शनिवार) सकाळी जारी करण्यात आला. सर्व 31 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा …

Read More »