Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर शहरातील विद्यानगरात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य; नगरपंचातीचे दुर्लक्ष

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात ऐन पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यानगरात रस्त्याचा पत्ताच नाही. त्याचबरोबर गटारी नाहीत. ज्या नगरपंचायतीला रस्ते, गटारी, पथदिवे, पाणी याची काळजी नाही. अशा नगरपंचातीकडून विकास कधी होणार. मात्र दुसरीकडे नगरपंचायत प्रत्येक घराचा फाळापट्टी, पाणी पट्टी, दिवा पट्टी, वर्षाच्या वर्षाला भरून घेण्याची तसदी घेतात. मात्र रस्ता, गटारी, पाणी, दिवे याची सोय करण्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते.
अशीच परिस्थिती खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात झाली आहे. या विद्यानगरातील रस्त्यावर पावसामुळे चिखल, खड्डे पडले आहेत. गटारी नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
यामुळे शालेय लहान मुलांना, महिलाना घरा बाहेर पडणे कठीण झाले आहे. तेव्हा खानापूर नगरपंचतीने तसेच नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी काळजीपूर्वक रस्ता, गटारीची कामे करून विद्यानगरातील रहिवाशांच्या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी विद्यानगरातील रहिवाशांतून होताना दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *