Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

दहावी परीक्षेची ३१ मार्चपासून सुरुवात

  परीक्षा केंद्रांवर सुविधा बेळगाव : दहावीची परीक्षा अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. शिक्षण खात्याने परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केंद्रप्रमुखांना करण्यात आली आहे. बेळगाव शैक्षणिक. जिल्ह्यातील १२० परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ३३ हजार १८२ …

Read More »

पाचवी, आठवीची बोर्ड परीक्षा उद्यापासून

  बेळगाव : पाचवी व आठवीच्या बोर्ड परीक्षेला सोमवार (ता. २७) पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. प्रशिक्षण खात्यानेही परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. क्लस्टरनिहाय पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पेपर झाल्यानंतर शाळांना क्लस्टरवर उत्तरपत्रिका वेळेत द्याव्या लागणार आहेत. शिक्षण खात्याने पाचवी …

Read More »

भालके खुर्दला गवतगंजी खाक

  खानापूर : भालके खुर्द (ता. खानापूर) येथे शनिवारी सायंकाळी चार वाजता विद्युत वाहिनीच्या डीपीतील शॉर्टसर्किटमुळे गवतगंजीला आग लागली. या घटनेत शेतकरी निंगाप्पा सिमानी अळवणी यांच्या घरापाठी मागील परसात असलेल्या चार ट्रॅक्टर गवतगंजीला आग लागून ३५ ते ४० हजाराचे नुकसान झाले. विद्युत वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्ममध्ये सतत ठिणग्या उडत असल्याबाबत हेस्कॉमला …

Read More »

आप्पाचीवाडी फाट्यावर वाहनधारकांची कसून तपासणी

  कोगनोळी : आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक ठिकाणी तपासनाके उभारले आहेत. आप्पाचीवाडी फाटा या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आडी डोंगराच्या पश्चिमेकडील बाजूस मल्लिकार्जुन डोंगर कर्नाटक-महाराष्ट्राची सीमा असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या सर्व वाहनधारकांची या ठिकाणी कसून तपासणी करण्यात येत आहे. महसूल …

Read More »

कॉंग्रेसची उमेदवारी वशिलेबाजीने : कॉंग्रेस युवा नेते इरफान तालीकोटी यांचा आरोप

  खानापूर : खानापूर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज विद्यमान आमदार अंजली निंबाळकर यांचे नाव जाहिर होताच काँग्रेसचे युवा नेते व इच्छुक उमेदवार इरफान तालीकोटी यांनी ताबडतोब बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली असुन पत्रकारांनी आपण बंडखोरी करणार काय असे विचारले असता ते म्हणाले की, आपण …

Read More »

मतदारसंघात खालच्या दर्जाचे राजकारण : युवा नेते उत्तम पाटील

  सुळगाव येथे हळदी कुंकू कार्यक्रम कोगनोळी : सुळगाव येथे उत्तम पाटील युवाशक्ती व अरिहंत उद्योग समूह यांच्या वतीने महिलांच्यासाठी हळदी कुंकू व होम मिनिस्ट्रर कार्यक्रम झाला. दिपप्रज्वलन माजी आमदार सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, बाबुराव मगदूम व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. युवा नेते उत्तम पाटील यांचे सुळगाव ग्रामस्थांच्या …

Read More »

सिंगीनकोपच्या कोसळलेल्या शाळा इमारतीकडे शासनाचे दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीच्या तीन खोल्या जमिनदोस्त झाल्या. याची पाहणी केंद्रीय पथकासह जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. यावेळी केंद्रीय जल आयोग, जल उर्जा मंत्रालयाचे संचालक अशोक कुमार व्ही, यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अभ्यास पथकात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे अधीक्षक …

Read More »

खानापूरातील नव्या सरकारी दवाखान्याच्या इमारतीचा उद्घाटनाचा मुहूर्त नविन आमदारांच्या हस्ते होण्याचे संकेत?

  सध्या आचार संहितेचा बडगा? खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या सरकारी दवाखान्यासाठी २० कोटी रूपयाचा निधी वापरून नविन इमारत उभारण्यात आली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेच्या कचाट्यात सापडल्याने नविन सरकारी दवाखान्याच्या इमारतीचा उदघाटनाचा मुहूर्त आता कधी मिळणार की कर्नाटक राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला प्रारंभ …

Read More »

जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या हालचाली गतिमान

  खानापूर : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू असतानाच या निवडणुका पाठोपाठ राज्यातील जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणूका देखील होणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदार संघ पुनर्रचना झाली असून केवळ इतर मागास वर्ग आरक्षण जाहीर करणे शिल्लक राहिले आहे. येत्या आठ दिवसात हे आरक्षण देखील जाहीर होणार असून राज्य …

Read More »

विजयपूरात मित्राचा खून करून एकाची आत्महत्या

विजयपूर : एका तरुणाने मित्राचा चाकूने वार करून हत्या केल्याची व स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना विजयपूर शहरातील लक्ष्मी सिनेमा मंदिर समोरील राजधानी लॉजमध्ये घडली आहे. बेल्लारी जिल्ह्यातील हागरीबोम्मनहल्ली तालुक्यातील कृष्णपुरा तांडा येथील रहिवासी सी. इंद्रकुमार यांची हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. …

Read More »