काकासाहेब पाटील : सिद्धरामय्या यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ बुधवारी (ता.१५) निपाणी येथे प्रजाध्वनी यात्रेचे आयोजन केले आहे. सायंकाळी सहा वाजता येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर होणाऱ्या या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे …
Read More »येडीयुरापा यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
कलबुर्गी : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरला अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कलबुर्गी येथील जिवर्गी येथे ही घटना घडली. येडीयुरप्पा ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते ते हेलिकॉप्टर हेलिपॅडवर येण्यापूर्वी सोसाट्याचा वारा आला. त्यामुळे परिसरातील कचरा हेलिपॅडवर पडल्यामुळे हेलिपॅड दिसेनासे झाले. पायलटने वेळीच प्रसंगावधान राखून …
Read More »कोगनोळी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण
नागरिकांतून समाधान : मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न कोगनोळी : मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते हंचिनाळ रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून हंचिनाळ ते कोगनोळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पर्यंत रस्ता …
Read More »राज्यात पुन्हा कोरोनाचे वाढते प्रमाण; आज तज्ञांशी महत्वाची बैठक
बंगळूर : राज्यात कोरोना विषाणूची साथ हळूहळू डोके वर काढत असून सर्वत्र सर्दी, खोकला आणि तापाचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. यासाठी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर उद्या (ता. ६) आरोग्य विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेत आहेत. आठ मार्च रोजी साजरा होणाऱ्या …
Read More »खानापूरात ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या १४ व्या दहावी व्याख्यानमालेचा सांगता समारंभ संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या १४व्या दहावी व्याख्यानमालेचा सांगता समारंभ येथील लोकमान्य सभागृहात रविवारी दि. ५ मार्च रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे संस्थापक चेअरमन पिटर डिसोझा होते. तर व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून डेप्युटी कमांडर स्वप्निल व्ही टी, बीईओ राजश्री कुडची, बैलहोंगल तहसीलदार जयदेव अष्टगणीमठ, उद्योजक …
Read More »‘आप’ची कर्नाटकमध्ये एंट्री; पहिल्याच जाहीर सभेत भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करत हल्लाबोल
दावणगेरे : आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ‘आप’ पक्ष ताकदीने लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. काल, शनिवारी (दि. ४ मार्च) आपची पहिली सभा दावणगेरे येथे संपन्न झाली. या सभेत भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना केजरीवाल म्हणाले की, कर्नाटकच्या डबल इंजिन सरकारने केवळ भ्रष्टाचार डबल केला, पण विकास …
Read More »निपाणीच्या युवकाने बनवला समाज मनाचा ठाव घेणारा चित्रपट
लवकरच ‘गाभ’ चित्रपट प्रदर्शित ; समाजातील तरुण आणि जनावराची कथा निपाणी (वार्ता) : ‘गाभ’ हा शब्द उत्सुकता वाढविणारा असला तरी तो ग्रामीण भागात परवलीचा आहे. गाभ किंवा गाभण हे शब्द कृषक जीवनाची प्रचिती देतात. विशेषत: पशुपालकांचे जगणे त्याभोवती फेर धरणारे असते. बदलत्या अर्थ आणि कृषक कारणांमुळे वावर कसणाऱ्याला लग्नासाठी मुलगी …
Read More »हदनाळ परिसरात गव्या रेड्याचे दर्शन
शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण कोगनोळी : हदनाळ (तालुका निपाणी) येथील शेतामध्ये गव्या रेड्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी शेतामध्ये जाणाऱ्या शेतकरी बांधवांनी सतर्क राहून दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, हदनाळ येथील तुका पाटील आड्ड्याजवळ सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान काही …
Read More »आमदारपुत्र लाच प्रकरण; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे आंदोलन
कॉंग्रेस नेत्याना अटक; आमदार माडाळ वीरुपाक्षप्पांच्या अटकेचाही आग्रह बंगळूर : त्यांचे वडिल भाजप आमदार माडाळ वीरुपाक्षप्पा यांच्यावतीने ४० लाखांची लाच घेताना सरकारी अधिकारी प्रशांतकुमार एम. व्ही. यांना अटक केल्यानंतर काँग्रेसने शनिवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या राजीनाम्याची व आमदार वीरुपाक्षप्पा यांच्या अटकेची जोरदार मागणी केली. दरम्यान, या मागणीसाठी मुख्यमंत्री बसवराज …
Read More »लोकप्रतिनिधींकडून विकासकामाचे फलक उभारणे बेकायदेशीर!
बेंगळुरू : सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती तेथील लोकप्रतिनिधींच्या फोटोसाहित लावण्यात येते मात्र ही विकास कामे सर्वसामान्य जनतेकडून कर स्वरूपात आकारलेल्या पैशातून केली जातात यामध्ये लोकप्रतिनिधींच्या नावाचा फोटो फलक लावण्याचा प्रश्नच येत नाही अशी याचिका बेंगळुरू येथील एका व्यक्तीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta