Sunday , July 26 2026
Breaking News

दोन हजाराची नोट घेऊनही वोट नाही, नोटेवरच आली बंदी; सोशल मिडियावर जोक्सचा पाऊस

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाला कर्नाटकमधील निवडणुकीशी जोडत सोशल मिडियावर मिम्स, जोक्सचा पाऊस पडत आहे. एवढेच नव्हे तर काहींनी ‘शेवटची ही नोट कधी बघितली आठवत नाही’, अशा पोस्ट निपाणी भागात सोशल मिडियावर शेअर करीत अनेक दिवसांपासून ही नोट बाजारातून गायब असल्याकडेही लक्ष वेधले. ‘कुणाकडे असेल तर माझ्याकडे द्या’, अशा विनोदी पोस्टमुळे अनेकांचे मनोरंजनही होत आहे.
एखादी मोठी घटना घडल्यानंतर किंवा केंद्र, राज्य सरकारच्या मोठ्या निर्णयावर सोशल मिडिया वापरकर्ते लगेच सुरू होऊन जात असल्याचे अनेकदा अनुभवास आले. शुक्रवारी (ता.२९) रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला अन् सोशल मिडिया वापरकर्ते कामाला लागले.
अनेकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आदीवर दोन हजार रुपयांच्या नोटेच्या फोटोला हार घातल्याचा फोटो शेअर केला. दोन हजार रुपयांच्या नोटेच्या बंदीचा संबंध थेट कर्नाटक निवडणुकीशी जोडला आहे. ‘दो हजार की नोट लेकर भी वोट नही दिया था, लो अब दो हजार के नोटपर बंदीही लगा दी’ अशी पोस्ट अनेकांनी फेसबुकवर शेअर केली आहे. यावर अनेकांनी ‘स्माईली’ कमेंटमध्ये शेअर केल्या. एका तरुणीने बँकेत दोन हजारच्या नोटा जमा करण्यास वेळ नसेल तर मला द्या’, अशी पोस्ट शेअर केली. यावर एका बँकेतील कर्मचाऱ्यानेच ‘आम्ही बँकेत असूनही ही नोट आठवत नाही’, असे कमेंट बॉक्समध्ये नमूद करीत ही नोटबंदी योग्यच ठरवल्याचे दिसून आले. एका तरुणाने ‘दोन हजाराच्या नोटेची विल्हेवाट लावण्यासाठी भरपूर वेळ दिला’ अशी पोस्ट करीत मागील नोटबंदीच्या स्मृतींना उजाळा दिला. इन्स्टाग्रामवर अनेक विनोदी मिम्स दिसत आहेत. भाजपाविरोधकांनी विविध मिम्स शेअर करीत केंद्र सरकारलाही लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.

—————————————————————-
एका वेळी १० नोटा बदलता येतील
व्यवहारांसाठी जनता या नोटेची देवाणघेवाण करू शकते. मात्र, त्यांनी ३० सप्टेंबर २०२३ पूर्वी या नोटा बँकेत जमा कराव्यात किंवा बदलून घेणे योग्य राहील.जनतेला २ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी एका वेळी २० हजार रुपयांची मुदत आहे. म्हणजेच, एका वेळी १० नोटा बदलता येतील.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *