Wednesday , December 17 2025
Breaking News

कर्नाटक

पावसाच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

  बेळगाव : पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या देखरेख करून घरांच्या नुकसानीच्या नोंदी करून घ्याव्यात जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. आपत्ती व्यवस्थापन आयुक्तांना घराच्या नुकसानीसंदर्भात अतिरिक्त भरपाईचे वितरण करण्यासाठी परिपत्रक जारी करण्याचे …

Read More »

गर्लगुंजी- बेळगाव रस्त्यावर खड्डा बुजविण्यासाठी शेडूमिश्रीत माती, पीडब्लूडीचा निष्काळजीपणा

    खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावच्या कणवीजवळील गर्लगुंजी- बेळगाव रस्त्यावर भला मोठा खड्डा पडून महिना होत आला. मात्र खानापूर पीडब्लूडी खात्याने भर रस्त्यावरील खड्ड्यात ट्रॅक्टर भर शेडूमिश्रीत माती सोडून गेली आहे. खड्डा दुरूस्तीचे काम राहिले बाजुला या मातीच्या ढीगामुळे वाहतुकीला धोका झाला आहे. महिना ओलांडुन गेला तरी …

Read More »

हेम्माडगा- अनमोड रस्ता १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीस बंद

  खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजीपर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम असल्याने रेल्वे गेटवर संपर्क रस्ता निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. …

Read More »

भाजप तक्रार निवारण केंद्र आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने चिगुळे येथे नेत्र तपासणी शिबीर

खानापूर : खानापूर भाजप तक्रार निवारण केंद्र आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने चिगुळे ग्रामस्थांसाठी 12-10-2022 वर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा कार्यकर्ता यावेळी व्यासपीठावर गणपत गावडे, अनंत गावडे, जयदेव चौगुले, सचिन पवार, लाडूताई (ग्रामपंचायत सदस्य), आनंद तुप्पद (नंदादीप हॉस्पिटल) यांच्यासह भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होते. डॉ. …

Read More »

ऊसाला प्रतिटन ५ हजार ५०० रुपये घेणारच

  रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार : १५ ला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटकासह महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. बेळगाव जिल्ह्यात खासगी आणि सहकारी तत्त्वावरील लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय आणि उद्योगपतींचे २९ साखर कारखाने आहेत. त्यांच्यात एकजूट असल्याने आज तागायात कुणीही दर जाहीर केलेला नाही. दर जाहीर केल्या …

Read More »

जनसंकल्प यात्रेत भाजप नेत्यांचा कॉंग्रेसवर जोरदार हल्ला

  भारत जोडो यात्रेविरुध्द जनसंकल्प यात्रा, एससी, एसटी आरक्षण वाढीचे भांडवल बंगळूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, जनसंकल्प यात्रेला रायचूर येथे चालना देऊन कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. त्यांनी ‘एससी/एसटी आरक्षण वाढ’ हा त्यांच्या सरकारचा ट्रम्प कार्ड बनवला आहे. रायचूर तालुक्यातील गिल्लेसूगुर गावातून सुरू झालेल्या जनसंकल्प यात्रेदरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह …

Read More »

बंगळूरात छत कोसळून दोन कामगार ठार, तीन जखमी

  बंगळूर : “बंगळुरमध्ये मंगळवारी (ता. ११) एका इमारतीचे छत कोसळून दोन जण ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बंगळुरच्या महादेवपूर येथील हुडीजवळ मंगळवारी सकाळी इमारतीचे छत खाली कोसळल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २७ …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची गुरुवारी बैठक

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सभा गुरूवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे आयोजित केली आहे. सदर बैठकीत २१ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या जनजागृती मोहीमे संदर्भात तसेच १ नोव्हेंबर रोजी काळादिन पाळण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणी सदस्यांनी …

Read More »

महाराष्ट्रातून विक्रीसाठी आलेला अर्धा किलो गांजा जप्त

  निपाणी पोलिसांची कारवाई : आरोपीची हिंडलगा कारागृहात रवानगी निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातून दुचाकीवरून कर्नाटकात गांजा विक्रीसाठी येणाऱ्या एका युवकाला मोठ्या शिताफीने निपाणी पोलिसांनी त्याला अटक केल्याची घटना मंगळवारी (ता.११) घडली. अमीर बशीर जमादार (वय २१ राहणार तेरवाड ता. शिरोळ) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे सहा हजार रुपये …

Read More »

नंदगड ग्रा. पं. मासिक सभेत पीडीओ गैरहजर, बैठक वादळी

  खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीची मासिक बैठक नुकताच पार पडली. या बैठकीत ग्राम पंचायतीचे पीडीओ गैर हजर होते. यावेळी बैठकीत उपाध्यक्ष व सदस्यांनी ग्राम पंचायत पीडीओ आनंद भिंगे यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका असल्याने लोकायुक्तांच्याकडे तक्रार केली आहे. यावेळी बैठकीत ग्राम पंचायत सदस्यांनी मागणी केलेली माहिती जो पर्यंत …

Read More »