आमदार प्रकाश हुक्केरी : 23 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : आण्णासाहेब हवले यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या बोरगाव येथीलश्री सिद्धेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीला चालू आर्थिक वर्षात 1 कोटी 45 लाख 39 हजार 310 रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत आर्थिक सेवा करत आजवर जनमानसांच्या मनामनामध्ये या संस्थेने …
Read More »अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम व जंगलमय भागातील अबनाळी येथील प्राथमिक मराठी शाळेच्या तीन बुद्धिबळपट्टूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. नुकताच बैलहोंगल येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत अबनाळी शाळेच्या बुद्धिबळपट्टूनी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत खानापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत अप्रतिम खेळ दाखविला. यामध्ये बुद्धिबळपट्टू श्रीधर धनापा करंबळकर, …
Read More »हरुरीत महिला मेळाव्याला उत्कृष्ट प्रतिसाद
खानापूर (प्रतिनिधी) : डोकेगाळी व हरुरी (ता. खानापूर) गावामध्ये महिला मेळावा विठ्ठलराव हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली नुकताच पार पडला. यावेळी विधानसभा निवडणूकीत भाजपचा उमेदवार कोणी असू दे त्यांनाच निवडून द्या असे म्हणत रयत महिला मेळावामध्ये त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. विठ्ठलराव हलगेकर प्रत्येक गावागावांमध्ये महिला मेळावा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त …
Read More »मांजरी येथील विद्युत पुरवठा केंद्राची क्षमता वाढणार : शंकर पोवार
अंकली (प्रतिनिधी) : चिकोडी तालुक्यातील कृष्णा काठावरील मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी, येडूरवाडी, मांजरीवाडी या खेड्यांना सातत्याने भेडसावणाऱ्या विद्युत समस्या निवारण करण्यासाठी या परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले व राज्याच्या मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांना मांजरीवाडी येथील विद्युत केंद्राची क्षमता वाढवण्याची मागणी केली होती. …
Read More »म्हैसूर दसऱ्याने भारतीय संस्कृतीचा गौरव वाढविला : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
जगप्रसिध्द म्हैसूर दसरा महोत्सवाचे शानदार उद्घाटन बंगळूर : म्हैसूर दसऱ्याने भारतीय संस्कृतीचा गौरव वाढविला आहे. जैन आणि बौद्ध वारसा कर्नाटकात विलीन झाला आहे. आदिशंकराचार्यांनी पीठाची स्थापना करून देशाची प्रतिष्ठा वाढवली. बसवण्णा यांनी अनुभव मंटपातून समता आणि लोकशाहीची कामना केली. अनुभव मंटपाच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सामाजिक चर्चा झाल्याचे देशाच्या प्रथम …
Read More »हिरण्यकेशीला ऊस पुरवठा करा : रमेश कत्ती
संकेश्वर (महंमद मोमीन) : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना सभासदांनी हिरण्यकेशीला ऊस पुरवठा करण्याचे कार्य करायला हवे असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते हिरण्यकेशी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थान कारखाना अध्यक्ष निखिल कत्ती यांनी भूषविले होते. …
Read More »खानापूर येथील भाग्योदय मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीला ८ लाख ३७ हजार रुपये नफा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील श्री भाग्योदय मल्टीपर्पज को सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या सभागृहात नुकताच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन नगरसेवक आप्पया कोडोळी होते. यावेळी सभेला माजी आमदार अरविंद पाटील, पोलिस काॅस्टेबल प्रकाश गाडीवड्डर, राजेश मडवाळकर आदी मान्यवराची उपस्थित होती. तसेच सोसायटी व्हाईस चेअरमन दिपक कोडचवाडकर तसेच …
Read More »कोगनोळीजवळ कार रिक्षा अपघातात दोघेजण जखमी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या राजीव गांधी नगर जवळ कार व मालवाहू रिक्षा अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 26 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. दिलीप सांगावे राहणार सौंदलगा हे गंभीर जखमी तर वसंत रणदिवे सौंदलगा हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेली …
Read More »कोगनोळी शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शालेय साहित्य वितरण
कोगनोळी : येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्यावतीने शालेय साहित्याची वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी बंडा पाटील हे होते. विलास गायकवाड यांनी स्वागत करून प्रास्ताविकात महाराष्ट्र युवा एकीकरण समिती यांच्यावतीने मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी बोलताना बंडा पाटील …
Read More »डाॅक्टरांचा उजवा हात फार्मासिस्ट : डाॅ. नंदकुमार हावळ
संकेश्वर (महंमद मोमीन) : डॉक्टरांचा उजवा हात म्हणून फार्मासिस्ट (औषध विक्रेते) यांना ओळखले जाते. फार्मासिस्टचे काम जबाबदारीचे जोखमीचे असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ यांनी सांगितले. ते संकेश्वर फार्मसी डे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संकेश्वर औषध विक्रेता संघातर्फे फार्मसी डे उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta