Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात उतरले आहे. व्यापार परवाना न घेता वसाहत करणाऱ्या मोठ्या शोरूम्स आणि दुकानांना महापालिका अधिकाऱ्यांनी दणका देण्यास सुरुवात केली आहे.

बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या कडक सूचनेनुसार शहराच्या उत्तर आणि दक्षिण विभागातील आरोग्य निरीक्षकांनी ही संयुक्त मोहीम राबवली. समादेवी गल्लीतील प्रसिद्ध ‘कल्याणी स्वीट मार्ट’वर पथकाने धाड टाकली असता, तिथे व्यापार परवान्याशिवाय व्यवहार सुरू असल्याचे उघड झाले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दुकानाला तातडीने ५,००० रुपयांचा दंड ठोठावून कडक इशारा देण्यात आला.कारवाईचे सत्र पुढे सुरू ठेवत अधिकाऱ्यांच्या पथकाने खडे बाजार येथील ‘लेन्सकार्ट’ शोरूमची तपासणी केली. तिथेही ट्रेड लायसन्सशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने ५,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला. शहरातील प्रत्येक व्यावसायिकाने अनिवार्यपणे परवाना घेणे गरजेचे असून, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *