Monday , June 1 2026
Breaking News

हलगा येथील बीबी फातिमा दर्ग्याचे देवकरी धाकलू बिळगोजी यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव : हलगा देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष, देवकारी पंच, प्रगतशील शेतकरी, म ए समितीचे कार्यकर्ते, बसवान गल्ली हलगा येथील रहिवासी श्री. धाकलू फकीरा बिळगोजी (वय वर्षे ८८) यांचे गुरुवार दिनांक ५ रोजी दुःखद निधन झाले. पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.
धाकलू फकीरा बेळगोजी एक धार्मिक स्वभावाचे होते. हलगा गावातील मरगाई मंदिर, पेटी बसवाना मंदिर, ज्योतिबा भैरीदेव मंदिर, होळीकामान्ना मंदिर, मातंगी मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष तर श्री कलमेश्वर, श्री भावकेश्वरी, श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीचे कार्यकारी सदस्य होते. तसेच हलगा येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या बीबी फातिमा दर्ग्याचे देवकरी म्हणून त्यांना सर्वजण ओळखत असत, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मोहरम सण हा उत्साहात साजरा केला जात होता. गावातील प्रत्येक धार्मिक, सामाजिक कार्यात यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाने बिळगोजी कुटुंबियाबरोबर हलगा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरुवार दिनांक ५ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता हलगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

युवा समिती सीमाभागच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सन्मान

Spread the love  बेळगाव : युवा समिती सीमाभाग च्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *