कोगनोळी (वार्ता) : येथील हणबरवाडी रोडवर असणार्या इनाम पट्टी मळ्यात वीस एकर उसाला शॉर्टसर्किटने आग लागून जळून खाक झाल्याची घटना मंगळवार तारीख 11 रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली. यामध्ये शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील हणबरवाडी रोडवर असणार्या इनाम पट्टी मळ्यात …
Read More »वल्लभगडावर एनएसएसची स्वच्छता मोहिम
संकेश्वर (वार्ता) : येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. मंदार हावळ यांच्या सौजन्याने वल्लभगडावर आज संकेश्वर महाविद्यालयाच्या (एन.एस.एस.) विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेचे कार्य केले. संकेश्वरजवळ असलेल्या वल्लभगडाला शिवकालिन इतिहास राहिला आहे. वल्लभगडाचे संवर्धन करण्याचे काम संकेश्वर दुर्गवीर प्रतिष्ठान आणि डॉ. मंदार हावळ परिवाराकडून केले जात आहे. संकेश्वर एसडीव्हीएस शिक्षण संस्था …
Read More »चिक्कोडी प्रांताधिकारीपदी संतोष कामगौडा रुजू
चिक्कोडी (वार्ता) : मूळचे चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर गावचे रहिवासी आणि 2014 च्या तुकडीचे केएएस अधिकारी संतोष कामगौडा यांनी चिक्कोडी प्रांताधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. कर्नाटक प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संतोष कामगौडा यांनी आधी प्रशिक्षणार्थी म्हणून व नंतर विविध ठिकाणी अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. रायचूर येथे प्रांताधिकारी म्हणून त्यांनी आपल्या …
Read More »बंद घराचे कुलूप तोडून एक तोळ्याचे दागिने लंपास
निपाणी (वार्ता) : बंद घराचे कुलूप तोडून एक तोळ्याचे दागिने व रोख पाच हजार रुपये चोरी झाल्याची घटना मंगळवारी (ता.11) सकाळी येथील भाट गल्ली येथे उघडकीस आली. या घटनेमध्ये मीना खंडेराव शेटके यांना सुमारे 60 हजार रुपयांचा फटका बसला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मीना शेटके या घरी …
Read More »भूरूनकीची ग्रामसभा नोडल अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे लांबली!
खानापूर (वार्ता) : तालुक्यातील गावाचा विकास व्हावा. म्हणून तालुक्यातील 51 ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु भुरूनकी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीची ग्रामसभा केवळ नोडल अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे सोमवारी दि. 10 रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा रद्द करण्यात आली. ग्रामसभा म्हणजे सामान्य नागरिकांना मिळणारा न्याय असतो. म्हणून ग्राम पंचायतीच्या …
Read More »खानापूर आश्रय कॉलनीतील धोकादायक ट्रान्सफॉर्म हलवा
खानापूर (वार्ता) : खानापूर शहरातील वॉर्ड नंबर 1 मधील आश्रय कॉलनीमध्ये रहदारीच्या ठिकाणी उभारण्यात आलेला विद्युत्त खांब्यावरील ट्रान्सफॉर्म बदलण्याची मागणी वॉर्ड नंबर एक मधील आश्रय कॉलनीतील नागरिकांनी तहसील कार्यालय, हेस्कॉम खाते तसेच नगरपंचायातीच्या अधिकारी वर्गाना निवेदन देऊन केली. निवेदनात म्हटले आहे की, वॉर्ड नंबर एक मधील आश्रय कॉलनीमध्ये 11000 व्हॅटची …
Read More »नाईट कर्फ्यू, विकेंड कर्फ्यूचा जानेवारी अखेरपर्यंत विस्तार
कोविड नियंत्रणासाठी निर्बंध; लॉकडाऊनचे भवितव्य गुरुवारी बंगळूर (वार्ता) : कर्नाटक सरकारने मंगळवारी विद्यमान नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू जानेवारीच्या अखेरीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. कोविड संसर्गाचा वाढता प्रसार व राज्याची 10.30 टक्क्यांवर गेलेली सकारात्मकता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. विद्यमान निर्बंध 19 जानेवारी रोजी संपणार होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या …
Read More »विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर शाळाबंदीचे सावट!
12 हजारांचे उद्दिष्ट : आठवड्याभरात केवळ 40 टक्के लसीकरण निपाणी (वार्ता) : आरोग्य विभागाच्या वतीने 15-18 वयोगटातील शाळाकरी विद्यार्थ्यांना लसीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने शासनाने शाळा बंदीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बेळगाव जिल्ह्यात अद्याप असा आदेश काढण्यात आला नसला तरी येत्या काही दिवसात त्याची शक्यता …
Read More »वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन
राजू पोवार : रयत संघटनेतर्फे वनाधिकार्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : गेल्या महिन्यापासून शेंडूर व परिसरातील डोंगरी भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यांच्याकडून ऊसासह इतर पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय शेतकर्यांमध्ये ही या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा संघटनेतर्फे आंदोलन केले जाईल, …
Read More »संकेश्वर बाजारात ट्रॉफिक जाम…!
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरची प्रमुख बाजारपेठ आज ट्रॉफिक जाम झालेली दिसली. शनिवार, रविवार विकेंड कर्फ्युमुळे जुना पी. बी. रस्ता ते कमतनूर वेस तसेच गावात सर्वत्र शुकशुकाट होता. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बाजारात किराणा वस्तू, तसेच अन्य वस्तू पोच करण्यासाठी वाहने रस्त्यावर उभी करण्यात आल्यामुळे दुचाकी-चारचाकी वाहने लोकांच्या गर्दीत फसलेली पहावयास …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta