Thursday , November 21 2024
Breaking News

क्रिडा

“ऑलिम्पिक असोसिएशनची समिती आणि माझं निलंबन अमान्य”, संजय सिंह यांनी क्रीडा मंत्रालयाविरोधात दंड थोपटले

  नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघावरून मोठं घमासान चालू आहे. क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाची नवी कार्यकारिणी नुकतीच बरखास्त केली. तसेच निवडणूक जिंकून कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झालेल्या सजय सिंह यांना निलंबित केलं आहे. दरम्यान, संजय सिंह यांनी भारतीय ऑलिम्पिक संघाविरोधात दंड थोपटले आहे. संजय सिंह म्हणाले, “भारतीय ऑलिम्पिक संघाने नेमलेली …

Read More »

3-4 महिन्यांपूर्वी प्रत्येकजण मला शिवीगाळ करत होता; राहुलने व्यक्त केल्या भावना

  नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये सलग दुसरे शतक झळकावणारा टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल सोशल मीडियावर ट्रोल्सचा सामना करण्याच्या त्याच्या पद्धतीबद्दल उघडपणे बोलला आहे. इतर खेळाडूंप्रमाणे वहाबलाही नकारात्मक टिप्पणीचा फटका बसतो यावर त्याने भर दिला. राहुल म्हणाला की, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दुखापतीमुळे स्वत:बद्दल विचार करण्यास वेळ …

Read More »

मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करतेय; विनेश फोगाटची मोठी घोषणा

  नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगाटने मोठी घोषणा करत मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. …

Read More »

केंद्राचा ब्रिजभूषण यांना दणका! भारतीय कुस्ती महासंघाच्या नव्या अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचे निलंबन

  नवी दिल्ली : ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय कुस्ती महासंघाची नवीन कार्यकारिणी तसेच भारतीय कुस्ती संघटनेचे नवे अध्यक्ष संजय सिंग यांना निलंबित केले आहे. एवढेच नाही तर भारतीय कुस्तीगीर संघटनेच्या सर्व निर्णयांना सरकारने स्थगिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर …

Read More »

मी पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान मोदींना परत करतो! कुस्तीपटू बजरंग पुनियाचा धक्कादायक निर्णय

  नवी दिल्ली : ”मैं अपना पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्री जी को वापस लौटा रहा हूँ. कहने के लिए बस मेरा यह पत्र है. यही मेरी स्टेटमेंट है,” असे ट्विट करून बजरंग पुनियाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुकीचा निकाल लागताच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर …

Read More »

संजू सॅमसनचे शतक अन् अर्शदीपचा मारा, भारताचा मालिका विजय

  भारताने तिसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने आफ्रिकेत वन डे मालिका जिंकली होती. त्यानंतर लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली आज भारताने ही कमाल करून दाखवली. मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड व महेंद्रसिंग धोनी यांनाही हा पराक्रम करता आला नव्हता. संजू …

Read More »

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर! मोहम्मद शमीसह २६ जणांना अर्जुन पुरस्कार, सात्विक-चिरागला खेलरत्न

  नवी दिल्ली : क्रीडा पुरस्कारांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतातील दोन युवा बॅडमिंटन स्टार्सची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना देण्यात येणार …

Read More »

भारतीय गोलंदाजीपुढे यजमान सपशेल अपयशी! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून दणदणीत विजय

  जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून दणदणीत पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशा फरकाने आघाडी घेतली. या विजयात अर्शदीप-आवेश …

Read More »

ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता!

  अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेटने पराभव करत सहाव्यांदा चषकावर नाव कोरले. ट्रेविस हेडचं झंझावती शतक आणि लाबुशनेचं संयमी अर्धशतकामुळे भारताच्या विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगले. भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियानं याआधी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये …

Read More »

द. आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’! ऑस्ट्रेलियाची आठव्यांदा फायनलमध्ये धडक

  कोलकाता : वनडे वर्ल्डकपच्या राऊंड रॉबीन लीगमध्ये भारतानंतर दुसर्‍या क्रमांकाचा यशस्वी संघ म्हणून गणला गेलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाने ऐन मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. कोलकाता येथे सेमीफायनल लढतीत ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर 3 विकेट्सने निसटता विजय मिळवून आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. आता 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीनवेळचा विश्वविजेता भारत आणि …

Read More »