पोर्ट ऑफ स्पेन : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. पहिल्या आणि तिसऱ्या सत्रात पावसामुळे काही षटकांचा खेळ वाया गेला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने पाच विकेटच्या मोबदल्यात २२९ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडे …
Read More »भारताची युवा ब्रिगेड अन् पाकिस्तान अ यांच्यामध्ये आज अंतिम लढत; कोण जिंकणार आशिया चषक
कोलंबो : इमर्जिंग एशिया कपच्या फायनलमध्ये आज भारत अ संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान अ संघाविरुद्ध जेतेपदासाठी खेळणार आहे. भारतीय संघ चांगल्या फॉर्ममुळे विजयाचा दावेदार मानला जात आहे. भारताने बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला तर पाकिस्तानने श्रीलंका संघाविरोधात विजय मिळवत फायनलचे तिकिट मिळवले. बुधवारी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारताने …
Read More »वेस्ट इंडिजकडून दमदार प्रत्युत्तर, भारताकडे अद्याप 352 धावांची आघाडी
पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने 438 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजनेही दमदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने एक बाद 86 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने दमदार फलंदाजी केली. भारताकडे अद्याप 352 धावांची आघाडी …
Read More »जयस्वाल, रोहित, विराटची दमदार अर्धशतके, पहिल्या दिवसाअखेर भारत 4 बाद 288 धावा
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या दमदार सुरुवातीनंतर विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने चार विकेटच्या मोबदल्यात 288 धावा केल्या आहेत. विराट कोहली 87 आणि रविंद्र जाडेजा 36 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार अर्धशतके झळकावली. भारताचा मध्यक्रम झटपट कोसळळा. …
Read More »२० वर्षीय कार्लोस अल्कारेज विम्बल्डनचा बादशाह, जोकोविचचा पराभव करत जिंकले दुसरे ग्रँड स्लॅम
आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच याला विम्बल्डनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. २० वर्षीय कार्लोस अल्कारेज याने जोकोविचचा पराभव करत दुसरे ग्रँड स्लॅम जिंकले. अटीतटीच्या सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेज याने विम्बल्डन चॅम्पियनशीप २०२३ वर नाव कोरले. रविवारी (१६ जुलै) लंडंनमध्ये झालेल्या फायनल सामन्यात वर्ल्ड नंबर १ अल्कारेज याने अनुभवी नोवाक …
Read More »अश्विनच्या फिरकीपुढे कॅरेबिअन आर्मी गारद, भारताचा एक डाव आणि 141 धावांनी विराट विजय
यशस्वी जयस्वालची पदार्पणात शतकी खेळी आणि आर. अश्विनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात १२ विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सात विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजा …
Read More »भारत-वेस्ट इंडिज कसोटी; यशस्वी-रोहितची शतके, भारताकडे 162 धावांची आघाडी
डोमिनिका : कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारत मजबूत स्थितीत आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल दोघांनी शतके झळकावली आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने दोन बाद 312 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल 143 आणि विराट कोहली 36 धावांवर खेळत आहेत. भारताकडे 162 धावांची आघाडी आहे. यशस्वी जयस्वाल आणि विराट …
Read More »भारत-वेस्ट इंडिज कसोटी; पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व
डोमिनिका : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारी डोमिनिकामध्ये बुधवारी खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याला काल (बुधवारपासून) सुरुवात झाली. सामन्याचा पहिल्या दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या बाजूनं होता. वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत सर्वात आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 150 धावा करुन ऑल …
Read More »तमीम इक्बालचा २४ तासांत यू-टर्न, निवृत्ती घेतली मागे
ढाका : बांगलादेशचा कर्णधार तमीम इक्बालने गुरुवारी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2023 च्या विश्वचषकाच्या तीन महिने आधी घेतलेल्या त्याच्या निर्णयाने बांगलादेश क्रिकेटमध्ये खळबळ उडाली होती. अशा स्थितीत 24 तासांत यू-टर्न घेत त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी हे केले. बांगलादेशने …
Read More »बांगलादेशचा कर्णधार तमीम इकबालने घेतली तडकाफडकी निवृत्ती
ढाका : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघ्या तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहेत. त्याआधीच बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा कर्णधार तमीम इकबाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आफगाणिस्तानविरोधात झालेल्या मानहाणीकारक पराभवानंतर तमिम इकबाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तीन महिन्यानंतर भारतामध्ये विश्वचषक होणार आहे, त्यापूर्वीच नियमीत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta