कोलंबो : कोलंबो येथे रंगलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराज याने कहर केला. सिराजच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा डाव ५० धावांत आटोपला. श्रीलंकेचे हे माफक आव्हान भारताने एकही विकेट न गमावता पार केले. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी झटपट फलंदाजी करत विजय मिळवून दिला. भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषकावर …
Read More »श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, मेंडिस-असलंकाची धमाकेदार खेळी
कोलंबो : आशिया चषक 2023 च्या सुपर-4 च्या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये लढत होणार आहे. डीएलएसच्या नियमांनुसार, या सामन्यात श्रीलंकेसमोर 252 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी …
Read More »भारताची आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक, श्रीलंकेला 41 धावांनी हरवले
कोलंबो : कुलदीप यादवच्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. भाराताने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 172 धावांत संपुष्टात आला. या विजयासह टीम इंडियाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सुपर 4 फेरीत भारताने सलग दुसरा विजय नोंदवलाय. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी …
Read More »विराट-राहुलचा डबल धमाका, कुलदीपचा पंच, पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव
कोलंबो : विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या दमदार शतकी खेळीनंतर कुलदीप यादव याने भेदक गोलंदाजी केली. भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त 128 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. कुलदीप यादव याने पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कुलदीप यादव …
Read More »विश्वचषकाच्या 15 शिलेदारांची घोषणा; के. एल. राहुल, सूर्याला संधी
मुंबई : विश्वचषकासाठीच्या 15 शिलेदांराची घोषणा आज करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय शिलेदारांची नावे जाहीर केली. अपेक्षाप्रमाणे 15 खेलाडूंची निवड करण्यात आली आहे. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांना अंतिम 15 खेळाडूमध्ये स्थान मिळाले नाही. सूर्यकुमार यादव याला संधी …
Read More »भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!
बुडापेस्ट : जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दणदणीत कामगिरी केली आहे. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. त्याने ८८.१७ मीटरपर्यंत भालाफेक केली. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसर्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या …
Read More »भारताच्या प्रज्ञानानंदची झुंज अपयशी! कार्लसन झाला विश्वविजेता
बाकू (अझरबैजान) : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे. भारताच्या आर. प्रज्ञानानंद याला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या, त्यामुळे आज टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला. यामध्ये कार्लसन याने बाजी मारली. कार्लसन याला प्रज्ञानानंद यानी कडवी …
Read More »प्रज्ञानानंदने कार्लसनला झुंजवलं, दुसरा डावही बरोबरीत, विजेता उद्या ठरणार!
बाकू (अझरबैजान) : भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याने फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याचा घामटा काढला आहे. प्रज्ञानानंद याने सलग दुसऱ्या दिवशी दुसरा डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. अखेरची 35 मिनिटं अटीतटीची झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी सामना बरोबरीत सोडण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे दुसरा …
Read More »हीथ स्ट्रीक नॉट डेड… झिम्बाब्वेच्या माजी क्रिकेटरच्या पोस्टनं खळबळ
हरारे : झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक यांचं वयाच्या 49 व्या वर्षी कॅन्सरनं निधन झाल्याची बातमी आली अन् संपूर्ण क्रिडाविश्वावर शोककळा पसरली. परंतु, आता स्ट्रीकचं निधन झालं नसून तो हयात असल्याचा दावा स्ट्रीकचा सहकारी आणि एका माजी क्रिकेटरनं केला आहे. माजी क्रिकेटर हेन्री ओलांगा यानं …
Read More »झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकचे कर्करोगाने निधन
हरारे : क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू हीथ स्ट्रीक यांचे बुधवारी वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. काही काळापूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ते चौथ्या स्टेजच्या कॅन्सरशी झुंज देत होते. तेव्हापासून हीथ स्ट्रीकची प्रकृती चिंताजनक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta