बेळगाव : बाग परिवाराचा काव्य वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हनुमान जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम जत्तीमठात आटोपशीरपणे पार पडला. लग्नसराई, सणासुदीत सुद्धा बाग परिवाराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्राध्यापिका मनीषा नाडगौडा यांनी प्रेम तुझे नी माझे, आणि रंगस्त्रीत्वाचा, अस्मिता आळतेकर यांनी माठातील पाणी आणि सुट्टी …
Read More »पौरकार्मिक संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बेळगाव : बेळगाव महापालिका पौरकार्मिक संघाच्या वतीने काल सोमवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा, मनपा अधिकारी उदय तळवार, नगरसेवक रवी साळुंखे, नितीन जाधव, …
Read More »घुमटमाळ मारुती मंदिरात महापौर, उपमहापौरांचा सत्कार
बेळगाव : हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिर येथे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर व या भागातील नगरसेवकांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि श्रीफळ देऊन करण्यात आला. मारुती मंदिर हे वार्ड क्रमांक 29 व वार्ड क्रमांक 41 यांच्यामध्ये आहे. वार्ड क्रमांक 41 चे नगरसेवक मंगेश पवार हे असून वार्ड क्रमांक 29 …
Read More »बेळगाव रेल्वे स्थानकावर मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले…
बेळगाव : जिंदालहून मिरजकडे जाणाऱ्या मालगाडीच्या दोन डबे बेळगावातील मिलिटरी महादेव देवस्थानजवळ रेल्वे रुळावरून उतरल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बेळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म बदलत असताना जिंदाल ते मिरजेला जाणारी लोहखनिज गाडी रुळावरून घसरली. रेल्वेच्या डब्यांमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली …
Read More »शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी कडोली येथील डॉल्बी साऊंड सिस्टीमची ट्रॉली पलटी; दोन तरुण जखमी
बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेळगाव येथील शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी कडोली गावातून निघालेली डॉल्बी साऊंड सिस्टीमची ट्रॉली अगसगाजवळ उलटून दोन तरुण जखमी झाले आहेत. या अपघातात कडोली येथील भरत संभाजी कांबळे (२२) आणि रोहिल मॅगेरी (२८) हे दोघे जखमी झाले असून त्यांना तातडीने बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात उपचारासाठी …
Read More »राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेत शितल कोल्हापूरे यांची चमक
बेळगाव : बेळगावच्या महिला धावपटू शितल कोल्हापुरे यांनी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या खेलो मास्टर्स राष्ट्रीय स्तरावरील अथेलेटिक्स स्पर्धेत स्पृहणीय संपादन केले आहे. खेलो मास्टर्स अणि फिट मास्टर यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे 11 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान चौथी खेलो मास्टर्स राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक्स स्पर्धा पार …
Read More »राष्ट्रीय तायक्वांडोपटू त्रिवेणी भडकन्नवर हिचा सन्मान
बेळगाव : राज्यस्तरीय स्पर्धेसह भारतीय ऑलिम्पिक संघ व वर्ल्ड तायक्वांदोशी सलग्न इंडिया तायक्वांडो मार्फत आयोजित वरिष्ठ राष्ट्रीय तायक्वांडो चॅम्पियनशिप उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल काकती येथील त्रिवेणी भावकांना भडकन्नवर हिला यक्षीत युवा फाउंडेशनचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक व पंच श्रीपाद रवी राव यांनी रुपये 10 हजार रुपयांचे प्रोत्साहन धन देऊन नुकतेच …
Read More »बेळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : बेळगावात संविधान शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. बेळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा पंचायत, समाजकल्याण …
Read More »पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅलीतून जनजागृती
बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या आणि जायंटस ग्रुप ऑफ परिवार बेलगाम, वेणुग्राम मल्टी परपज को ऑपरेटिव्ह सोसायटी, साई स्पोर्ट्स अकॅडमी बेलगाम यांच्या वतीने पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये वय वर्ष ३ ते २५ वर्षाच्या ३५० स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. या …
Read More »संजीवीनी फौंडेशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बेळगाव : आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शकुंतलाअम्मा यांच्याहस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर शोभा बखेडी यांनी पुष्पहार अर्पण केला. चेअरमन मदन बामणे यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी उपस्थित साऱ्यांनी आंबेडकरांचा जयजयकार केला.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta